Goa-Belgaum FDA Raid Dainik Gomantak
गोवा

गुळातही सापडली भेसळ! राज्यात प्रोटीनच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांना FDAचा दणका

FDA Raid Goa: गोवा-बेळगाव सीमेवर मोले येथे अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या तपासणीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

Akshata Chhatre

Fake Jaggery Seized Goa: गोवा-बेळगाव सीमेवर मोले येथे अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या तपासणीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत तब्बल ६०० किलो गूळ जप्त करण्यात आला असून, त्यात 'सनसेट येलो' आणि 'टार्ट्राझिन' या रंगांची मोठ्या प्रमाणावर भेसळ असल्याचे निष्पन्न झाले. गूळ उत्पादनात कोणत्याही प्रकारच्या रंगाचा वापर करण्यास परवानगी नसतानाही, भेसळयुक्त गूळ बाजारात आणला जात होता.

गुळातही आढळली भेसळ

या गुळाची तपासणी केली असता, त्यात १७.४८ मिलीग्राम प्रति किलो 'सनसेट येलो' आणि ६२.६७ मिलीग्राम प्रति किलो 'टार्ट्राझिन' आढळले. १४-१५ ऑगस्ट रोजी ही मोठी कारवाई करण्यात आली. लेबल नसलेल्या या गूळ-वाहनाला अडवून प्रशासनाने सखोल तपास केला, तेव्हा हे प्रकरण समोर आले. ग्राहकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकणारी ही भेसळ उघड झाल्यानंतर, संपूर्ण गूळ नष्ट करण्यात आला आहे.

पनीरच्या नावाखाली व्हेजिटेबल ऑइल

गुळाच्या भेसळीनंतर, एफडीएने आणखी एका मोठ्या कारवाईत पनीर उत्पादकांचा पर्दाफाश केला आहे. कुंंडई, फोंडा येथील एका युनिटमध्ये कमी चरबी असलेल्या दुधात व्हेजिटेबल ऑइल आणि सायट्रिक ऍसिड मिसळून 'ॲनालॉग पनीर' बनवले जात होते. या पनीरला 'डेअरी पनीर' असे लेबल लावून, मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटना पुरवले जात होते. यामुळे ग्राहकांना प्रोटीनयुक्त पनीरच्या नावाखाली कमी दर्जाचे पदार्थ मिळत होते.

एफडीएने जेव्हा या युनिटवर छापा टाकला, तेव्हा पनीर बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या व्हेजिटेबल ऑइलचे पाकिटे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू होता. तपासणीत या पनीरमध्ये 'सिटोस्टेरोल' या पदार्थाचे १.५७६ मिलीग्राम प्रति किलो प्रमाण आढळले, जे पूर्णपणे अवैध आहे.

या युनिटच्या मालकाकडे फक्त नोंदणी प्रमाणपत्र होते, पण पनीरच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी आवश्यक परवाना नव्हता. विशेष म्हणजे, पॉंडिचेरीच्या एका शिक्षण घेतलेल्या व्यक्तीने काही महिन्यांपूर्वीच हे युनिट सुरू केले होते. एफडीएने दोन्ही प्रकरणांमध्ये दोषींवर कारवाई सुरू केली असून, या प्रकरणांचा शोध सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New GST Rate: जीएसटी कॉन्सिलचा मोठा निर्णय! आता फक्त 5 आणि 18 टक्के दोनच कर; काय होणार स्वस्त? वाचा सविस्तर

Goa Politics: 'मग तुम्हीच तो DPR जनतेसमोर आणा!’ मुरगाव बंदरातील कोळसा वाहतुकीवरुन अमित पाटकरांचं सुदिन ढवळीकरांना थेट आव्हान

Viral Video: व्हायरल होण्याचा हव्यास ‘आंटींला' पडला भारी, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण, म्हणाले,'हे रिलवाले...'

Mumbai Goa Highway: “एक आडवा न तिडवा खड्डा चंद्रावाणी पडला गं…”; मुंबई-गोवा महामार्गाच्या दुर्दशेवर इन्फ्लुएन्सरने मांडली व्यथा VIDEO

शारदीय नवरात्रीतून मिळतायत 'हे' शुभसंकेत, देवीचे वाहन ठरवणार तुमचं भाग्य; वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT