Goa Beef Strike Dainik Gomantak
गोवा

Goa Beef Strike: गोव्यात ख्रिसमसची 'रुचकर' सुरुवात; मांस विक्रीची दुकाने उघडली

Goa Beef Strike Meat Shops: ख्रिसमसच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच बुधवारपासून मांस विक्रीची दुकाने सुरू

Akshata Chhatre

Goa Beef Strike Christmas Meat Shops Open

पणजी: राज्यात मागील दोन दिवस मांस विक्री बंद ठेवण्यात आली होती. हिंदुत्ववादी संघटना गाड्या अडवत असल्याने व्यवसायाला अडचणी निर्माण होत असल्याने विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली होती. मंगळवारी (२४ डिसेंबर) मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कायदा हाती घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिल्याने मांस विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे, त्यामुळे ख्रिसमसच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच बुधवारपासून मांस विक्रीची दुकाने सुरू होतील, असे विक्रेत्यांनी सांगितले आहे.

दक्षिण गोव्यात मडगाव येथील एका गोरक्षक गटाशी संबंधित असलेल्या सदस्यांसोबत नुकत्याच झालेल्या वादानंतर, बीफ व्यापाऱ्यांनी सोमवारी त्याच्या निषेधार्थ दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील सर्व बीफ विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली होती. ख्रिसमसच्या तोंडावर राज्यात बीफ टंचाईला सामोरे जावे लागू शकते, अशी अफवा पसरली होती. गोवा मीट कॉम्प्लेक्सचे एमडी डॉ. राजेश केणी यांनी ख्रिसमससाठी बीफची कमतरता भासणार नाही, असे आश्वासन दिले होते.

दोन दिवस होती दुकानं बंद!

म्हापसा येथील गोमांस व्यापाऱ्यांनी सोमवारी राज्यातील गोरक्षक गटाने केलेल्या छळाचा कारण देत राज्यव्यापी दुकाने बंद ठेवण्यास पाठिंबा दिला आणि त्यांना संरक्षण देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली. गोमांस व्यापाऱ्यांनी या मुद्द्यावर उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

कुरेशी मांस व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मुन्ना बेपारी म्हणाले की, पोर्तुगीज काळापासून आम्ही आमचा व्यवसाय करत आहोत, परंतु आम्हाला कधीही कोणाकडून त्रास दिला गेला नाही. पशुसंवर्धन, गोवा मीट कॉम्प्लेक्स, डॉक्टर आणि पोलिस यांसारख्या सरकारी अधिकाऱ्यांशी आमचा संबंध आहे, मात्र गेल्या एक महिन्यापासून काही कार्यकर्ते आणि गोरक्षक गट थेट व्यवसायावर हल्ला करत आहेत.

गोव्यात गोमांस विक्री होऊ नये हा या गटाचा मुख्य उद्देश आहे. हा व्यवसाय नुकताच सुरू झालेला नाही आणि पोर्तुगीज काळापासून सुरू आहे. गोवा हे पर्यटन स्थळ आहे जिथे विविध प्रकारचे लोक राहतात. त्यांना गोव्यात गोमांसावर बंदी घालायची आहे पण हा छळ थांबला पाहिजे” असे बेपारी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

SCROLL FOR NEXT