पणजी: गेल्या दहा दिवसांपासून गोव्यातील बीफची टंचाई कायम असून, पणजी, मडगाव आणि म्हापसा येथील बहुतांश मांसविक्रीची दुकाने बंद आहेत. या संकटाचा मोठा फटका व्यावसायिक आणि ग्राहकांना बसतोय. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आता गोवा मांस व्यापारी संघटनेने (Quraishi Meat Traders Association) पुढाकार घेतला आहे.
या संकटावर तोडगा काढण्यासाठी संघटनेने थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे एक निवेदन सादर केले आहे. यामध्ये त्यांनी सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
१. आंतरराज्यीय चर्चा: महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारसोबत चर्चा करून गोव्यासाठी बीफचा पुरवठा पुन्हा सुरू करावा.
२. निर्यात बंदी: म्हशींच्या मांसाच्या निर्यातीवर मर्यादा घालावी.
३. सीमा तपासणी: राज्याच्या सीमांवर पोलिसांची विशेष पथके तैनात करून पुरवठ्यातील अडथळ्यांवर लक्ष ठेवावे.
४. हेल्पलाईन सेवा: पुरवठ्यामध्ये येणाऱ्या अडचणींची माहिती देण्यासाठी हेल्पलाईन सुरू करावी.
संघटनाचे सरचिटणीस अन्वर बेपारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही व्यापारी शेजारच्या राज्यांतून कमी प्रमाणात बीफ मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मागणी जास्त असल्याने ते लगेच संपून जाते.
मात्र, सोमवारपासून तर राज्यात बीफचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झालाय. उसगाव येथील गोवा मीट कॉम्प्लेक्समधून सध्या फक्त 'कोल्ड मीट'चा पुरवठा होतोय, पण ग्राहकांची मागणी ताज्या बीफलाच जास्त आहे, त्यामुळे या टंचाईचा मोठा परिणाम दिसून येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.