Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs: गोवा ड्रग्जचे संक्रमण केंद्र! दक्षिणेतील 8 राज्यांच्या बैठकीत सूर; तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी समन्वय

Drug Transit Hub Goa: देशात अमलीपदार्थांचा साठा मोठ्या प्रमाणात सापडत असून त्याच्या व्यवहाराचा आवाका दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच्या पार्श्‍वभूमीवर दक्षिणेतील राज्यांची समन्वय बैठक हल्लीच झाली.

Sameer Panditrao

पणजी: देशात अमलीपदार्थांचा साठा मोठ्या प्रमाणात सापडत असून त्याच्या व्यवहाराचा आवाका दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच्या पार्श्‍वभूमीवर दक्षिणेतील राज्यांची समन्वय बैठक हल्लीच झाली. गोव्यासह आठ राज्यांमधील अमलीपदार्थविरोधी विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

या बैठकीत गोवा हे ड्रग्जचे संक्रमण केंद्र बनल्‍याचा सूर व्‍यक्‍त करत त्यावर विस्‍ताराने चर्चा झाली. या ड्रग्ज तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी समन्वय साधण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्राने दिली.

तेलंगणा राज्यात गोव्यासह तेलंगणा, हैद्राबाद, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू व आंध्र प्रदेशच्या पोलिस अधिकाऱ्यांची बैठक झाली. गोव्याच्या अमलीपदार्थविरोधी कक्ष अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

गेल्या काही महिन्यांत गोव्यात हैद्राबादच्या काही ड्रग्ज तस्करींना अटक करण्यात आली होती, तर तेलंगणा व हैद्राबाद पोलिसांनी गोव्यातून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. या कारवाईवेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्जही जप्त करण्यात आला होता. त्या पार्श्‍वभूमीवर दक्षिण क्षेत्रातील राज्यांची ड्रग्ज माफिया व विक्रेत्यांविरोधात प्रखर कारवाई करण्यासाठी ही समन्वय बैठक घेण्यात आली.

माहितीचे होणार आदानप्रदान

या बैठकीवेळी गोवा हे छोटे राज्य असले तरी पर्यटन राज्य असल्याने ड्रग्जची तस्करी गोव्यातून शेजारील राज्यात होत असल्याबाबत चर्चा करण्यात आली. गोवा हे संक्रमण केंद्र (ट्रान्झिट सेंटर) असल्याने परदेशातून भारतीय आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारा ड्रग्ज हा गोव्यात येऊन त्याची तस्करी होत असल्याची मते काही राज्यांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे ड्रग्ज माफिया तसेच विक्रेत्यांची माहिती अदानप्रदान करण्याबाबतही चर्चा झाली.

ड्रग्ज माफिया व हवालाचे मोठे नेटवर्क

ड्रग्ज माफिया व हवाला हे नेटवर्क मोठे असून विविध पद्धतीने हा व्यवहार केला जातो. या हवालामध्ये पैशांचा व्यवहार करणारे ऐकमेकांना ओळखत नाहीत. मात्र, त्यांच्या कोडिंगद्वारे त्याचा व्यवहार होतो. हे पैसे परदेशात पाठविले जातात. ड्रग्ज तस्करीतून जमा केलेल्या पैशांच्या हवालाचे नेटवर्क देशभर पसरले असल्याने राज्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Canacona: ..समुद्र राजा आता शांत हो! मच्छीमार महिलांकडून काणकोणात समुद्रपूजन; समुद्रात सोडला नारळ

Goa Athletics: साक्षी, राणी, निकेतचा ‘डबल’ धमाका! राज्य ॲथलेटिकमध्ये पुरुषांत मोझेस, अनंतकृष्णन यांच्यात चढाओढ

Horoscope: सावध राहा! अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे 'या' राशीच्या लोकांना पडेल महागात

Goa Live News: कूटबण जेट्टीवर आढळले कॉलराचे सहा रुग्ण

Goa Cricket: गोवा संघात येणार 'नवा पाहुणा'! फलंदाजी होणार भक्कम; थेट कर्णधारपदी होणार निवड?

SCROLL FOR NEXT