Goa Drug Case: कारच्या डिक्कीतून गांजाची तस्करी, गोव्यात महाराष्ट्रातील दोघांना अटक; 40 लाखांचा मुद्देमाल जप्त

Goa Police Arrest Two From Maharashtra: क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक विकास देयकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने म्हापसा येथील धुळेर पेट्रोल पंपाजवळ दोन महाराष्ट्रातील संशयित आरोपींना अटक केली.
30 lakh ganja case
30 lakh ganja caseDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: गोव्यातील अमली पदार्थ विरोधी मोहिमेत गुन्हे शाखेने एक मोठे यश मिळवले आहे. क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक विकास देयकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने म्हापसा येथील धुळेर पेट्रोल पंपाजवळ दोन महाराष्ट्रातील संशयित आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत त्यांच्याकडून तब्बल ३० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे, ज्याची किंमत अंदाजे ३० लाख रुपये आहे.

डिक्कीत लपवला होता लाखो रुपयांचा गांजा

बुधवार (दि.११) रोजी पहाटे १:४० ते सकाळी ६:३० च्या दरम्यान म्हापसा येथील धुळेर पेट्रोल पंपाजवळ केलेल्या या छाप्यात, सुखदेव भगवान कोळी (वय २१, रा. सावेल्डे, जि. धुळे, महाराष्ट्र) आणि रवींद्र विठ्ठल भील (वय २४, रा. साळवी, आमोदे, शिरपूर, धुळे, महाराष्ट्र) या दोन आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ३० किलो गांजा जप्त करण्यात आला, ज्याची अंदाजे किंमत ३० लाख रुपये आहे.

30 lakh ganja case
Goa Crime: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 2.59 कोटींच्या अमली पदार्थांसह बेकायदेशीर वास्तव्याप्रकरणी तीन स्वीडिश नागरिकांना अटक

हा गांजा त्यांनी त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी सियाज (MH-05-BM-२०२०) कारच्या डिक्कीत लपवला होता.

पोलिसांनी गांज्यासह १० लाख रुपये किमतीची कार, १०,००० रुपये किमतीचा वन प्लस कंपनीचा मोबाईल फोन आणि ३७० रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे ४० लाख १० हजार रुपये आहे.

गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू

या प्रकरणी गुन्हे शाखा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७२/२०२५, एनडीपीएस कायदा, १९८५ च्या कलम २०(b)(ii)(C) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विकास देयकर यांच्याकडे या प्रकरणाचा पुढील तपास सोपवण्यात आलाय.

पोलीस उपअधीक्षक राजेश कुमार आणि पोलीस अधीक्षक आयपीएस राहुल गुप्ता यांच्या देखरेखीखाली हा तपास सुरू आहे. या मोठ्या कारवाईमुळे गोव्यातील ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com