National Night Out 2022| Goa Nightlife |Goa Beach Dainik Gomantak
गोवा

National Night Out 2022: गोव्याचे हे समुद्रकिनारे नाईट लाइफसाठी सर्वोत्तम

Goa Best Beaches For Night Out: गोव्याचे (Goa) नाईट लाइफ केवळ देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे

दैनिक गोमन्तक

2 ऑगस्ट हा दिवस नॅशनल नाईट आउट डे म्हणुन साजरा करत आहे. नागरिक, संघटना, पोलिस आणि समुदायाचा सहभाग वाढवणे आणि विश्वास मजबूत करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. तुमचा परिसर सुरक्षित करणे. जेणेकरुन रात्रीच्या वेळी कोणीही न घाबरता बाहेर पडू शकेल. नॅशनल नाईट आऊट डेनिमित्त ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात

गोव्याचे (Goa) नाईट लाइफ केवळ देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. कारण गोव्यात असे अनेक नाईट आऊट स्पॉट्स आहेत, जिथे उत्तम गोवण फुड, पार्टी अन् डान्स इत्यादींचा आनंद घेता येतो. तुम्‍ही मित्रांसोबत पार्टी करायचा किंवा नाईटलाइफचा आनंद घेण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी गोव्यापेक्षा चांगली जागा असू शकत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गोव्याच्या अशाच काही समुद्रकिनाऱ्यांबद्दल (Beach) सांगणार आहोत, जिथे तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत, फॅमिली मेंबर्ससोबत पार्टी करण्यासाठी नाईटलाइफ ट्रिपचा (Trip) प्लॅन करू शकता.

Palolem Beach

पालोलेम बीच हे गोव्यातील सर्वात सुंदर ठिकाण आणि पार्टी स्पॉट्सपैकी एक आहे. हे ठिकाण गोव्याच्या दक्षिण टोकाला आहे. हा बीच गोव्यातील सर्वोत्तम आणि रोमँटिक ठिकाणांपैकी एक आहे. येथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत मस्त डिनर प्लॅन करू शकता आणि डेटचा आनंद घेऊ शकता. तसेच मित्रांसह पार्टी करू शकता. या बीचवर रात्रभर पार्टी चालते, ज्यामध्ये रात्रीच्या जेवणाव्यतिरिक्त तुम्ही बीचवरील सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता.

Palolem Beach

Baga Beach

तुम्ही बागा बीचला भेट देण्याची आणि मजा करण्याचा प्लन करू शकता. हा बीच गोव्याची राजधानी पणजीपासून (Panji) सुमारे 17.3 किलोमीटर अंतरावर आहे. येथे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत हँग आउट करण्यासाठी येऊ शकता, कॉन्टिनेंटल फूडचा आस्वाद घेउ शकता आणि रात्री डान्स करू शकता आणि बार इत्यादीचा आनंद घेउ शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पार्टी स्पॉट निवडू शकता.

Baga Beach

Arambol Beach

गोव्यात अनेक बीच स्पॉट आहेत, जे पार्टी स्पॉट्स आणि नाईट लाइफसाठी प्रसिद्ध आहेत. पण हे गोव्यातील एक असे ठिकाण आहे , जे मौजमस्तीसाठी ओळखले जाते. तुम्ही जर पार्टी टाईप असाल, तर पार्टीसाठी अरामबोल बीच तुमच्यासाठी योग्य आहे. येथे तुम्ही पार्टी, सेलिब्रेशन, बर्थडे पार्टी इत्यादी सेलिब्रेट करू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या मित्रांसोबत लाइट पार्टीचा आनंद घेऊ शकता. परवडणाऱ्या किमतीत स्वादिष्ट खाद्यपदार्थांसह तुम्ही येथे बोट राइडचा आनंद घेऊ शकता.

Arambol Beach

Vagator Beach

या पार्टी स्पॉट्स व्यतिरिक्त, गोव्यात वागातोर बीच देखील आहे. जिथे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नाइट पार्टीचा प्लॅन करू शकता. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की हा बीच उत्तर गोव्यातील मापुसा रोडजवळ आहे. मात्र, या बीचवर तुम्हाला इतर बीचच्या तुलनेत थोडी कमी गर्दी पाहायला मिळेल. पण इथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत हनिमून प्लॅन करू शकता. तुम्ही या बीचवर सुंदर आणि रोमँटिक वॉकचा आनंद घेऊ शकता. इथे रात्रभर पार्टी चालते, तुम्ही तुमच्या वेळेनुसार इथे जाऊ शकता.

Vagator Beach

तुम्ही जेव्हाही गोव्याला जाल तेव्हा या बीचला भेट द्यायला विसरू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kunal Thakur Success Story: दिव्यांगत्वावर मात करत कुणाल ठाकूर बनले पेडणे पालिकेचे मुख्याधिकारी; शिक्षणासह समाजकार्यातही उमटवला ठसा

Goa Road Accidents: गोव्यात 'वीकएंड' ठरतोय जीवघेणा! ऑगस्टमध्ये 226 अपघात, 20 सप्टेंबरपर्यंत 188 जणांचा मृत्यू

Mershi Porvorim Traffic: मेरशी-पर्वरी मार्गावर वाहतुकीचा फज्जा; अटल सेतू-उन्नत मार्गाचे पर्याय बंद होताच जुन्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

VIDEO: 'जगाचे नेते भाषण ऐकताहेत, हे साहेब ट्रेंडिंग रिल्स शोधताहेत'! युएन बैठकीतील सीरियाई राष्ट्राध्यक्षांचा भन्नाट टाइमपास व्हायरल; तुम्ही पाहिला का व्हिडिओ?

Bicholim Theft Case: ऐन चतुर्थीच्या धामधुमीत मेणकुरेत दिवसाढवळ्या घरफोडी; बंद घरातून 15 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास, 20 जण ताब्यात

SCROLL FOR NEXT