Night Party Dainik Gomantak
गोवा

Goa Beach Parties: १५ ऑगस्टपासून ट्रान्स पार्ट्या? प्रदूषण मंडळ, पोलिस यंत्रणेच्या भूमिकेवर लक्ष

Goa Trance Parties: हणजूण ते हरमलपर्यंत तेवीस पेक्षा जास्त ट्रान्स पार्ट्यांची आयोजन करण्यात आल्याबाबतची जाहिरातबाजी सध्या सोशल मीडियावर सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: स्वातंत्र्यदिनापासून १८ ऑगस्टपर्यंत उत्तर गोव्यातील समुद्र किनारपट्टीवर म्हणजे हणजूण ते हरमलपर्यंत तेवीस पेक्षा जास्त ट्रान्स पार्ट्यांची आयोजन करण्यात आल्याबाबतची जाहिरातबाजी सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. या २३ पार्ट्यांना सर्व आवश्यक परवानगी दाखले आहेत की नाहीत, याबाबत संभ्रम आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलिस यंत्रणेच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

वागातोर व हणजूण येथे नाईट क्लब म्हणून कार्यरत असलेल्या रेस्टॉरंट्समध्ये नियोजित पार्ट्यांचे आयोजन केल्याचे समजते. तसेच ओपन-एअर असलेले हरमलमध्ये चार दिवस रात्रभर पार्ट्यांचे नियोजन केले आहे. या संगीत पार्ट्या म्हणजे, ध्वनी प्रदूषणाच्या नावाने एक प्रकारे स्वातंत्र्यावर गदा म्हणता येईल.

याशिवाय वागातोर याठिकाणी दोन रेस्टॉटंरने स्वातंत्र्यदिनाच्या पार्टीच्या तिकिटांची विक्री सुरू केली आहे. या कार्यक्रमांच्या ऑनलाइन तिकीट विक्रीला वेग येत असताना, प्रशासकीय यंत्रणेने याविषयी मौन धारण केलेले दिसते. प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार ते संगीत वाजवण्यासाठी आस्थापनांना परवानग्या जारी करत नसते.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी दिली जाते, तर जीएसपीसीबी फक्त ऑपरेट करण्यास संमती देते. ज्याला बोर्डाची संमती नसते, ती ठिकाणे बंद केली जातात, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

पूर्णवेळ निरीक्षक हवा!

गुरुवारी स्वातंत्र्यदिन येत असल्याने, लाँग विकएण्ड आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची संभावना आहे. अशावेळी हणजूण हा परिसर ट्रान्स पार्टी हब बनू शकतो. कारण, १५ ते १८ ऑगस्टपर्यंत अनेक ठिकाणी ट्रान्स पार्ट्यां आयोजिल्या आहेत, असे समजते. मुळात हणजूण पोलिस निरीक्षकांना आसगाव घर मोडतोड प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे या काळात हणजूणला पूर्णवेळ निरीक्षकांची गरज आहे.

प्रदूषण मंडळ कुठे आहे?

ज्या ठिकाणी पार्ट्या होणार आहेत, त्याची प्रदूषण नियंत्रण मंडळास माहिती आहे का?, तसेच संबंधितांनी त्यांना मंजुरी दिली आहे का?, आणि या आस्थापनांकडून आवाज निरीक्षण प्रणाली उभारल्यास, त्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून निरीक्षण होत आहे का? असे काही प्रश्न आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Modi Express: "गणपतीक गावाक जावचा हा ना!" नितेश राणेंची कोकणवासियांना भेट; मोदी एक्सस्प्रेसची घोषणा

IGNOU New Course: आता घरबसल्या मिळवा ‘भगवद्गीते’वर मास्टर डिग्री! इग्नूने सुरु केला नवा अभ्यासक्रम; आपत्ती व्यवस्थापन अन् कृषी खर्चावरही डिप्लोमा

Goa Live News: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घरांवर तिरंगा उंच फडकविण्याचे आवाहन केले

Goa Crime: सांगे पालिकेच्या इमारतीजवळ आढळला कामगाराचा मृतदेह, जवळच सापडल्या दारुच्या बाटल्या; परिसरात खळबळ

Viral Video: प्रेत समजून पोलिस अन् ॲम्ब्युलन्सला बोलावलं, पण नंतर जे घडलं, ते पाहून सगळेच थक्क; पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT