Goa Beach Parties: गोव्याची किनारपट्टी बनतेय 'पार्टी झोन'; रात्रीपासून पहाटेपर्यंत झिंग, स्थानिकांची उडाली झोप...

ध्वनी प्रदूषण टीपेला
Goa Beach Parties
Goa Beach Parties Dainik Gomantak

Goa Beach Late Night Parties Noise Pollution: गोव्यातील किनारपट्टीचा भाग पुन्हा पार्टी झोन बनत चालला आहे. रात्रभर सुरू राहणाऱ्या पार्ट्या आणि त्यातील उच्च आवाजातील संगीतामुळे किनारपट्टीवरील गावकऱ्यांची झोप उडाल्याचे चित्र आहे.

या पार्ट्या रात्री सुरू होतात आणि पहाटेपर्यंत सुरू असतात. त्यातून ध्वनी प्रदूषण टीपेला पोहचत असल्याचेही स्थानिकांनी म्हटले आहे.

काही काळापूर्वी, गोव्यातील उच्च न्यायालयाने गोवा पोलिसांना ध्वनी प्रदूषणावर कारवाई करण्यात निष्क्रीय राहिल्याबद्दल फटकारले होते. त्यानंतर लगेचच पोलिसांनी काही ठिकाणी छापे टाकले. पण, ते तेवढ्यापुरतेच होते.

पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रमाणे पार्ट्या आणि त्याच्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष सुरू झाले आहे, असे सांगितले जात आहे. त्यातून आता विविध लेट नाईट पार्टी आयोजकांनी कायद्याची भीती न बाळगता आगामी हंगामासाठी तयारी करण्यास सुरवात केली आहे, असे दिसते.

Goa Beach Parties
गोव्यात फिरायला आले, जुगार शिकले; परतल्यावर गुरूग्राममध्ये सुरू केला कॅसिनो, 43 जणांना अटक...

बागा, वागातोर, हणजुणे येथील किनाऱ्यावर म्युझिकचा दणदणाट सुरू असतो. हे किनारे ध्वनी प्रदूषणाला बळी पडले आहेत. या किनाऱ्यावर संध्याकाळपासून पहाटेपर्यंतच्या पार्ट्यां सुरू असतात.

"एस्केपेड नाईट" सारखा इव्हेंट रविवारी रात्री ८ वाजता सुरू होईल तो सोमवारी पहाटे साडे पाच पर्यंत सुरू राहिल. सोशल मीडियात त्यांची जाहिरातही सुरू झाली आहे. "हँगओव्हर संडे एस्केप," हा कार्यक्रम दुसऱ्या रविवारी संध्याकाळी 6 वाजता सुरू होतो आणि सोमवारी पहाटे 4 वाजता संपतो.

"दिल्ली कलेक्टिव्हच्या", "डान्झा ड्रोम अंडरग्राउंड" रविवारी रात्री 8 ते सोमवारी पहाटे 4:30 पर्यंत वाढवले ​​गेले आहेत.

Goa Beach Parties
Goa Hospitality Institute: गोव्यात होणार हॉस्पिटॅलिटी प्रशिक्षण संस्था; पदवी, पदविका, व्यावसायिक अभ्यासक्रम...

केवळ ध्वनी प्रदूषणच नव्हे तर मद्यविक्री परवानग्या आणि कोस्टल रेग्युलेशन झोन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन आणि प्रतिबंधित ड्रग्जचा वापर याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. काहींनी पार्टीचे तास वाढवून कायद्याचे उल्लंघन केले आहे.

परवानगीची मर्यादा ओलांडून मद्यविक्री केली जात आहे. शनिवारी शिओली येथे झालेल्या शफल या कार्यक्रमात यात भरच घातली आहे.

यंदा मे महिन्यात हणजुणे येथे कर्कश संगीताबाबतच्या आरोप असलेल्या एका स्थानिकाच्या याचिकेवर सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले होते. विविध सोशल मीडियावर जाहिरातीतून विविध क्लब, पार्टी आयोजकांच्या प्रचार केला जात आहे. त्यातून पहाटेपर्यंतच्या संगीत कार्यक्रमांची जास्त प्रसिद्धी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com