<div class="paragraphs"><p>Goa Tourism</p></div>

Goa Tourism

 

Dainik Gomantak 

गोवा

नववर्षाच्या स्वागतासाठी किनारे गजबजले, नियम धाब्यावर

दैनिक गोमन्तक

हरमल : नववर्षाच्या आगमनासाठी गोमंतकीय व्यावसायिक आतुरलेले आहेत. गेले चार दिवस किनारा गजबजला असून कोविडपूर्व काळाची आठवण करून देणारी आहे. बहुतेक सर्व ‘गेस्ट हाऊस’ फुल्ल असल्याचा दावा व्यावसायिकांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारू नये, अशी मागणी होत आहे. दरम्यान, कोरोनाच्या (Corona) वाढत्या रुग्ण संख्येमुळे समुद्र किनाऱ्यांवर (Goa Beach) पर्यटकांची होणारी गर्दी चिंतेची बाब बनली आहे.

गेली दोन वर्षे कोविडच्या प्रभावामुळे व्यावसायिक हतबल झाले होते. सध्या कोविडच्या तिसऱ्या लाटेची धास्ती बरीच वाढत असल्याने व्यावसायिक चिंतेत असून धनकोचे हप्ते व कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवायचा हा प्रश्न अनुत्तरित असल्याचे व्यावसायिक बाबी हरमलकर यांनी सांगितले. सध्या देशी पर्यटकांची चलती असली, तरी त्यांची खर्च करण्याची क्षमता कमी झाल्याचे दिसून येते, असे त्यांनी सांगितले. या शेवटच्या टप्प्यात व्यावसायिक जादा नफा कमावण्यासाठी दर बरेच चढे ठेवत असल्याचे चित्र आहे.

पार्किंग सुविधांचा अभाव

महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक आदी राज्यांतील पर्यटक नववर्षाच्या स्वागतासाठी हरमल समुद्र किनाऱ्यावर उतरले आहेत. काल रेल्वेने शेकडो पर्यटक पोचले. मात्र, त्यांच्या गाड्या पार्किंगसाठी जागाच नसल्याने रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी बनली होती.

वाहतूक पोलिस सज्ज

देशातील पर्यटकांना गोव्यात (goa) येण्यास आडकाठी नसली, तरी त्याच निमित्ताने पर्यटकांची सतावणूक करून वाहतूक विभागाचे पोलिस शासकीय महसुलाचे उद्दिष्ट साध्य करीत असतात. त्यामुळे नकळत पर्यटनाला (Tourism) गालबोट लागते याची फिकीर नसते. अपघातास कारणीभूत ठरू पाहणाऱ्या वाहनचालकांना तंबी देण्याचे सोडून क्षुल्लक गोष्टीसाठी सतावणूक होते, असे स्थानिक व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

व्यवसाय तेजीत

दुचाकी गाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय सध्या तेजीत असल्याने व्यावसायिक सुखावले आहेत. नववर्ष असल्याने दुचाकींचा दर 600 ते 700 रुपये प्रतिदिन आहे. दरवर्षी दुचाकी गाड्यांचा नाताळ ते नववर्षापर्यंतचा दर अव्वाच्या सव्वा असतो, असे मत पर्यटक विनेश शहा यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT