Police Raid Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Beach Shacks: आदेशाचे उल्लंघन पडले महागात; कळंगुट बागा समुद्र किनाऱ्यावरुन नियमबाह्य शॅक्स पोलिसांनी हटवल्या

Goa Police Actions: कळंगुट-बागाच्या किनाऱ्यावर छापा टाकत पोलिसांनी शॅक मालकांवर कारवाई केली

Akshata Chhatre

बागा: गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवरील शॅक्सना काही ठराविक अंतरावरच बेड्स लावण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र शॅक मालकांनी हा आदेश न पळता मोजून दिलेलं अंतर सोडून बेड्स लावल्याने बुधवारी (२२ जानेवारी) कळंगुट-बागाच्या किनाऱ्यावर छापा टाकत पोलिसांनी शॅक मालकांवर कारवाई केली.

समुद्र किनाऱ्यांवर शॅकचा व्यवसाय चालवणाऱ्या व्यावसायिकांना शॅकपासून १५ मीटरच्या अंतरापर्यंत बेड्स लावण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र त्यांनी या आदेशाचं पालन न केल्याने पर्यटकांसाठी येण्याजाण्याच्या व्यत्यय निर्माण व्हायचा. बुधवारी पोलिसांनी तसेच पर्यटन विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी या समुद्र किनाऱ्याला भेट देऊन तिथल्या शॅक व्यावसायिकांवर कारवाई केली, तसेच त्यांच्याकडून दंड देखील वासून करण्यात आला.

पुन्हा एकदा शॅकसाठी १५ मीटरची जागा मोजून देण्यात आली तसेच या अंतराबाहेर असलेल्या शॅकना हटवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. गोवा पोलिसांकडून वेगवेगळ्या किनाऱ्यांवर अशाच प्रकारे वेळोवेळी लक्ष ठेवले जाईल तसेच दिलेल्या आदेशांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

समुद्राच्या भरतीच्यावेळी पाणी किनाऱ्यापर्यंत येतं, जे शॅकच्या बेड्सपर्यंत पोहोचतं आणि म्हणूनच सुरक्षिततेसाठी पोलिसांनी हा आदेश जारी केला होता. मात्र काही व्यावसायिक याचे अद्याप पालन करत नसल्याचे उघड झाले आहे आणि म्हणूनच पोलीस त्यांच्यावर करडी नजर ठेवतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT