Goa Tourist Saftey Dainik Gomantak
गोवा

Goa Tourist Saftey: जबरदस्तीने सेल्फी अन् डान्सचा अट्टाहास, गोव्याच्या किनाऱ्यावर महिला पर्यटकांसोबत असभ्य वर्तन

Domestic tourists allegedly harassing foreign women on goan beaches: देशांतर्गत पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या गोव्याच्या किनाऱ्यांवर सध्या एका धक्कादायक प्रवृत्तीने डोकं वर काढलं आहे.

Sameer Amunekar

पणजी: देशांतर्गत पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या गोव्याच्या किनाऱ्यांवर सध्या एका धक्कादायक प्रवृत्तीने डोकं वर काढलं आहे. आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या या राज्याच्या प्रतिमेला काही बेजबाबदार पर्यटकांच्या वागण्यामुळे तडा जात आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये एक भारतीय पर्यटक विदेशी महिलांशी असभ्य वर्तन करताना दिसत आहेत.

असभ्य वर्तन आणि 'सेल्फी'चा अट्टाहास

व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये पर्यटनाच्या नावाखाली आलेले काही गट विदेशी महिलांना विनाकारण त्रास देताना दिसत आहेत. या महिलांच्या संमतीशिवाय त्यांच्या जवळ जाणे, त्यांना स्पर्श करणे आणि जबरदस्तीने सेल्फी घेण्यासाठी गराडा घालणे, असे प्रकार सर्रास घडत आहेत.

इतकेच नाही तर, काही ठिकाणी या महिलांच्या खांद्यावर हात ठेवणे किंवा त्यांच्यासोबत जबरदस्तीने नृत्य करण्याचा प्रयत्न करणे, असे प्रकारही समोर आले आहेत. पर्यटकांच्या या 'हुल्लडबाजी'मुळे विदेशी पर्यटकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.

गोवा हे जागतिक पर्यटनाच्या नकाशावर एक महत्त्वाचे नाव आहे. मात्र, अशा घटनांमुळे परदेशात चुकीचा संदेश जात आहे. पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था असलेल्या या राज्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

जर विदेशी पर्यटकांनी सुरक्षेच्या कारणास्तव गोव्याकडे पाठ फिरवली, तर त्याचा मोठा फटका स्थानिक हॉटेल व्यावसायिक, टॅक्सी चालक आणि छोट्या दुकानदारांना बसू शकतो. "अतिथी देवो भव" या संकल्पनेला छेद देणाऱ्या या कृत्यांमुळे गोव्याच्या संस्कृतीवरही टीका होत आहे.

सुरक्षेसाठी कडक उपाययोजनांची मागणी

या गंभीर प्रकाराची दखल घेत गोव्यातील पर्यटन क्षेत्रातील भागधारकांनी आणि स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. केवळ कायदे करून उपयोग नाही, तर त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

समुद्रकिनाऱ्यांवर साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे अधिक भक्कम करणे आणि अशा विकृत पर्यटकांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करणे, या मागण्या आता जोर धरू लागल्या आहेत. गोव्याची सुरक्षित पर्यटन स्थळ ही ओळख टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

एकाच कुटुंबातील दोघांचा संशयास्पद अंत! मुलाचा रक्ताच्या थारोळ्यात मृत्यू, तर फ्लॅटमध्ये आईचा मृतदेह पाहून चक्रावले पोलीस; नेमकं प्रकरण काय?

Dawood Ibrahim Property: दाऊद इब्राहिमला मोठा धक्का! रत्नागिरीतील वडिलोपार्जित जमिनीचा लिलाव; गुन्हेगारी साम्राज्यातील मालमत्तेवर सरकारची टाच

Israeli Soldier Iranian Girl Love Story: दुश्मनी विसरुन बांधली प्रेमाची गाठ! इस्रायली फौजी अन् इराणी सुंदरीची 'लव्हस्टोरी'; युद्धाच्या रणधुमाळीत उरकला साखरपुडा

VIDEO: सर जडेजाच्या फिरकीचा खेळ खल्लास! वैभव सूर्यवंशीनं केली चौकार-षटकारांची बरसात; बॅटिंगचा थरार पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Horoscope 20 March 2026: 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव! सुख-सुविधा आणि प्रेमाचा योग, वाचा काय सांगते तुमचे आजचे भविष्य?

SCROLL FOR NEXT