Amboli Waterfall Dainik Gomantak
गोवा

Amboli: गोव्यातील तरुणांचा आंबोलीत राडा, साईड देण्यावरुन झाला वाद; एक पोलिस जखमी

Sawantwadi News: तरुणांविरोधात सावंतवाडी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद केला जाणार आहे, रात्री उशीरापर्यंत याबाबत प्रक्रिया सुरु होती.

Pramod Yadav

सावंतवाडी: गोव्यातून आंबोलीत पर्यटनासाठी आलेल्या तरुणामध्ये वाद झाला. साईड देण्यावरुन झालेला हा वाद सावंतवाडी पोलिस स्थानकात पोहोचला. पोलिस स्थानकांसमोर देखील तरुणांनी एकमेकांशी वाद घातला. या झटापटीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलिस स्थानकात पुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु होती.

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील १० ते १५ तरुणांचा ग्रुप आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आला होता. आंबोलीच्या घाटात साईड देण्यावरुन यांच्यात वाद झाला. हा वाद अखेर सावंतवाडी पोलिस स्थानकात पोहोचला.

पोलिसांनी मध्यस्थी करुन वाद सोडविण्याचा प्रयत्न केला पण, पोलिस स्थानकासमोर देखील तरुणांची झटापटी सुरु होती. पोलिसांशी देखील तरुणांनी हुज्जत घातली. यात एक पोलिस कर्मचाऱ्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे.

तरुणांविरोधात सावंतवाडी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद केला जाणार आहे, रात्री उशीरापर्यंत याबाबत प्रक्रिया सुरु होती.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबोली धबधबा प्रवाहित झाला आहे. आंबोली धबधबा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक सावंतवाडीत दाखल होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kundaim: ..तोल गेला आणि छतावरून खाली कोसळला! कुंडईतील घटना; झारखंडच्या कामगाराचा गोव्यात दुर्दैवी मृत्यू

Goa Live Updates: गोव्यात पावसाची दडी, तापमान वाढणार

Goa Weather Update: ऐन पावसाळ्‍यात कडकडीत ऊन, आठवडाभर कसं असेल हवामान हवामान? वाचा हवामान विभागाचा अंदाज

Romi Devanagari Konkani: रोमी-देवनागरी कोकणी वादाला पूर्णविराम, लिपीच्‍या वादातून तेढ निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न - मुख्‍यमंत्री सावंत

Vasco: मासेमारी सुरू होऊनही खारीवाडा जेटीवर सामसूम, 75 टक्के ट्रॉलर्स उभेच; परप्रांतीय कामगारांची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT