Award  Dainik Gomantak
गोवा

गोमंतकीय किलोवॉट कंपनीचा नॉर्वेत दबदबा

किलोवॉटचे सीईओ नितीश रायकर यांनी आनंद व्यक्त केला.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात मुख्यालय असलेल्या आयटी कंपनी किलोवॉटने (Kilowott) नॉर्वे देशात पुरस्कृत होऊन गोव्याचे नाव उंचावले आहे. किलोवॉटने ट्रान्सफॉर्म मॅगझिनकडून सर्वोत्कृष्ट नामकरण आणि ब्रँड स्ट्रॅटेजीमध्ये रौप्य आणि डिजिटल मालमत्तेच्या सर्वोत्तम वापरासाठी कास्यपदक जिंकले.

या पुरस्कारांद्वारे ट्रान्सफॉर्म मॅगझिनने डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड आणि आइसलँडचा समावेश असलेल्या नॉर्डिक प्रदेशात ब्रँड विकास आणि पुनर्ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन दिले आहे.

किलोवॉटच्या डिलिव्हरी टीमच्या प्रमुख आरती रायकर म्हणाल्या, कंपनीच्या (Company) सर्व कर्मचऱ्यांनी एकत्रित काम केल्याने आम्ही हा पुरस्कार जिंकू शकलो. ही सर्वांची सफलता आहे. कंपनीच्या कर्मचऱ्यांमध्ये असलेला संवाद आणि उद्योगातील आमच्या व्यापक अनुभवामुळे आम्हाला हे यश मिळाले आहे. खरंच, संवाद महत्त्वाचा आहे," आरती म्हणाल्या. किलोवॉटचे सीईओ नितीश रायकर यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, हा पुरस्कारने किलोवॉट टीमचे मनोबल वाढवले आहे.

दरम्यान गोव्याचे (Goa) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी किलोवॉट कंपनीचं कौतुक केलं आहे. ट्विट करुन गोव्याचं नाव सातासमुद्रापार पोहोचवणाऱ्या कंपनीचं मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Flight Cancelled: हिंडन ते गोवा विमानसेवा रद्द; ऐनवेळी प्रवाशांचे नियोजन बिघडले, एअर इंडिया एक्सप्रेसवर संताप

Calangute Drowning: मित्र नको म्हणाले तरी समुद्रात गेला, मोठी लाट आली आणि घात झाला; मणिपूरचा युवक कळंगुट किनाऱ्यावर बुडाला

Konkan Railway: गोव्यात रेल्वेतून आलेल्या 1104 परप्रांतीयांची तपासणी! कोकण रेल्वे पोलिसांची सुरक्षा मोहिम

Goa Assembly Live: आलेमाव यांनी वनहक्क दाव्यांचा मुद्दा उपस्थित केला

Old Goa construction: जुने गोवेतला ‘तो’ बंगला पाडा! विरोधक आक्रमक; सभापतींसमोर घेतली धाव, कामकाज स्‍थगित

SCROLL FOR NEXT