M. Venkaiah Naidu
M. Venkaiah NaiduDainik Gomantak

उपराष्ट्रपती नायडू 3 आणि 4 मार्च रोजी गोवा दौऱ्यावर

मागील वर्षी 28 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीत उपराष्ट्रपती गोवा दौऱ्यावर आले होते.
Published on

पणजी: भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू 3 आणि 4 मार्च रोजी दोन दिवसीय अधिकृत दौऱ्यानिमित्त गोव्याला भेट देणार आहेत. ते 3 मार्च रोजी गोव्यात येतील आणि 4 मार्च रोजी येथून रवाना होतील. त्यांच्यासोबत पत्नी एम. उषा गोव्याला भेट देणार आहेत. या दौऱ्यात उपराष्ट्रपती नायडू हे दोनापावला येथील राजभवनातील दरबार सभागृहाचे उदघाटन करणार आहेत.

M. Venkaiah Naidu
हरमलमध्ये विदेशी पर्यटकांनी दिला शांतीचा संदेश

मागील वर्षी 28 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीत उपराष्ट्रपती गोवा (Goa) दौऱ्यावर आले होते. त्याचे स्वागत राज्यपाल पी.एस.श्रीधरन यांनी केले होते. यावेळी नौदल हंस तळावर त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विर्नोडा पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com