Fly91 Goa-Lakshadweep flight 
गोवा

Goa-Lakshadweep flight: गोव्यातील Fly91 चे गोवा ते लक्षद्वीप पहिले उड्डाण, दोन शहरांसाठी थेट विमानसेवा लवकरच

Goa-Lakshadweep flight:केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नवी दिल्ली येथून या विमानाला हिरवा झेंडा दाखवला.

Pramod Yadav

Fly91 Goa-Lakshadweep flight

भारतीय नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील नवीन विमान कंपनी Fly91 ने मंगळवारी गोव्यातील मोपा आणि लक्षद्वीपमधील अगाट्टी दरम्यान पहिले उड्डाण घेतले.

केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नवी दिल्ली येथून या विमानाला हिरवा झेंडा दाखवला. येत्या 18 मार्चपासून गोव्यातून बेंगळुरू आणि हैदराबादला जोडणारी व्यावसायिक उड्डाण सेवा सुरु करणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

मागील दोन दशकांपासून आम्ही फक्त एअरलाइन्स बंद होतायेत असे ऐकत आलो, यात लहान आणि मोठ्या सर्व प्रकारच्या एअरलाइन्सचा समावेश आहे. पण, अलिकडे देशात उडान योजनेअंतर्गत, सहा नवीन विमान कंपन्या आल्या आहेत, असे नागरी उड्डाण मंत्री सिंधिया म्हणाले.

उडान योजनेअंतर्गत फ्लाय 91 ला 18 मार्ग देण्यात आले आहेत. मी त्याच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देऊ इच्छितो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या नागरी उड्डाणाला आता नवी गती प्राप्त होत आहे, असे सिंधिया म्हणाले.

Fly91 कंपनीचे सध्या दोन ATR 72-600 विमाने कार्यरत आहेत. पुढील सहा महिन्यांत कंपनी आणखी सहा विमाने त्यांच्या ताफ्यात सामील करण्याची शक्यता आहे.

कंपनीची ही फक्त सुरुवात आहे आणि आम्ही आगामी काळात टियर 2-3 शहरांवर अधिक लक्ष केंद्रित करू, असे Fly91 चे अध्यक्ष हर्ष रंगनाथन (राघवन) म्हणाले. तसेच, हवाई वाहतूक क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांबद्दल फ्लाय91 च्या अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

मोदी-शहांचे 'धक्कातंत्र' कायम; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची अनपेक्षित एन्ट्री! - संपादकीय

Goa News Live: लुथरा बंधू गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT