पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांच्या हिंदीतील भाषणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मुरगावातील सभेला संबोधित करताना माविन यांनी जमलेल्या अनेक लोकांना कोकणी कळत नसल्याचा दावा करत हिंदीत भाषण सुरु केले.
वास्कोचे आमदार कृष्णा दाजी साळकर यांनी रविवारी (दि.10) आयोजित केलेल्या द्वि - वर्ष - पूर्ती - उत्सव सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची दोन वर्ष या कार्यक्रमात माविन गुदिन्हो बोलत होते.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री राजेश फळदेसाई, आमदार संकल्प आमोणकर, दामू नाईक, माजी खासदार नरेंद्र सावईकर, वास्कोचे आमदार कृष्णा दाजी साळकर यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
'मी अलिकडेचे रायबरेली येथील एका मोठ्या सभेला हजेरी लावली होती. या सभेला सुमारे ४० हजार लोक उपस्थित होते. उपस्थितांनी मला बोलण्याचा आग्रह धरल आणि मी हिंदीतून भाषण केले, कारण तिथल्या लोकांना हिंदी शिवाय दुसरी भाषा कळत नाही.'
'तसेच, येथे देखील कृष्णा दाजी साळकर यांच्या मतदारसंघातील काही लोकांनी हिंदी कळते, त्यांना कोकणी देखील कळते पण, मी हिंदीतून देखील बोलणार आहे,' असे माविन गुदिन्हो म्हणाले.
यावेळी माविन यांनी अलिकडच्या काळात मोठी प्रगती झाल्याचा दावा करत काँग्रेसवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात अनेक विकासकामे होत असल्याचेही माविन म्हणाले.
मुरगाव येथील कार्यक्रमात पंचायत मंत्री माविन यांनी कोकणी ऐवजी हिंदीतून भाषण केल्याने राज्यातून नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
राजकीय नेत्याने काही करुन मातृभाषेला प्रोत्साहन देण्याचे काम केले पाहिजे, असे मत काही नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे. एका युझरने भाजप पक्षात सामिल व्हायची इच्छा व्यक्त करत त्याला कोकणी, हिंदी, मराठी, कन्नड भाषा येत असल्याचा सांगितले. तसेच, रशियन देखील शिकण्याची तयारी दर्शवली.
दुसऱ्या एका युझरने राज्यात कोकणी शिकण्यासाठी विविध ठिकाणी केंद्र उभारण्याची गरज व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.