Aggressive Dogs Ban In Goa Dainik Gomantak
गोवा

Aggressive Dogs Ban: राज्यात हिंस्र कुत्र्यांच्या जातींवर बंदी; रॉटविलर, पीटबुल बाळगल्यास कारवाई होणार, CM सावंतांची माहिती

Goa Aggressive Dogs Ban: राज्यात रॉटविलर आणि पीटबुल या हिंस्र स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या कुत्र्यांच्या जाती पाळण्यावर राज्य सरकार बंदी घालणार आहे.

Sameer Amunekar

पणजी : राज्यात रॉटविलर आणि पीटबुल या हिंस्र स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या कुत्र्यांच्या जाती पाळण्यावर राज्य सरकार बंदी घालणार आहे. यासंदर्भातील विधेयक राज्य विधानसभेच्या आगामी अधिवेशनात मांडण्यात येणार असून, त्याला राज्य मंत्रिमंडळाने झालेल्या बैठकीत मान्यता दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना पशुवैद्यकीय पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर म्हणाले, ‘रॉटविलर आणि पीटबुल या जाती अनेकदा हल्लेखोर आणि नियंत्रणाबाहेर जातात. त्यांच्याकडून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणालाही गंभीर इजा होण्याचा धोका असतो.

त्यामुळे हे श्वान घरात पाळण्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधेयकाच्या अंमलबजावणीनंतर संबंधित जातींचे पाळीव प्राणी घरात ठेवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.’ मंत्रिमंडळाने गोवा प्राणी प्रजनन आणि पाळीव प्राणी (नियमन व नुकसान भरपाई) विधेयक, २०२५ यास मंजुरी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT