Goa Bank | Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Goa Bank: ज्‍येष्‍ठांचा मदतनिधी आता एकाच दिवशी बँकेत जमा होणार

Goa Bank: ज्येष्ठ लोकांना एकाच तारखेला त्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यासाठीची प्रक्रिया सुरु झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Bank: समाजकल्याण खात्यातर्फे ज्येष्ठांसाठी राबविण्यात येणाऱ्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेतील मागील देय रक्कम लाभार्थ्यांना अदा करण्यात आली आहे. यापुढे ज्येष्ठ लोकांना एकाच तारखेला त्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

दरम्यान, त्यामुळे पैसे जमा झाल्याचा संदेश तत्काळ संबंधित लाभार्थ्याच्या मोबाईलवर मिळेल, अशी माहिती समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. राज्य सरकारने चालविलेल्या अनेक योजनांपैकी ज्येष्ठांना मदत देण्याची योजना त्यातील लाभार्थ्यांना खरोखरच फायदेशीर ठरत आहे. वयस्क, त्याचबरोबर इतर आजार किंवा काही समस्यांना तोंड देत असणाऱ्या ज्येष्ठांना या योजनेमुळे दिलासा मिळत आहे.

लाभार्थ्यांना पैसे मिळण्यात अडचणी येऊ नयेत किंवा त्यांना बँकेत हेलपाटे मारू लागू नयेत यासाठी त्यांच्या बँक खात्यावर एकाच तारखेला मदतीची रक्कम जमा होईल. त्‍यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ती प्रक्रिया काही कालावधीत पूर्ण होईल, यासाठी आपले खाते काम करीत आहे, असे फळदेसाई म्‍हणाले.

सुभाष फळदेसाई, समाजकल्‍याणमंत्री-

दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे वेगवेगळ्या बँकांमध्ये खाते आहे. ही सर्व खाती या योजनेअंतर्गत जोण्यासाठी काही वेळ लागेल. ते काम पूर्ण झाल्यावर ही योजना मार्गी लागेल व ती सुटसुटीत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT