Banastarim Bridge Accident  Dainik Gomantak
गोवा

Banastarim Bridge Accident: माजी सहकारी ठरला मृत्यूसाठी कारणीभूत

बाणस्तारी अपघात : सुरेश फडते व परेश सावर्डेकर फन स्कूलमध्ये होते एकत्र

गोमन्तक डिजिटल टीम

Banastarim Bridge Accident बाणस्तारी येथील भीषण अपघातातील मृत सुरेश आणि त्यांची पत्नी भावना फडते यांच्यावर काळाने घाला घातला. परंतु नियतीने असा काही वेगळा खेळ खेळली की, सुरेशचा मृत्यू त्याच्या माजी सहकाऱ्याच्या निष्काळजीपणा झाला.

सुरेश फडते आणि परेश सावर्डेकर हे दोघेही एकेकाळी खोर्ली औद्योगिक वसाहतीत असलेल्या फन स्कूल कंपनीमध्ये सहकारी होते, अशी माहिती समोर आली आहे.

सुरेश फडते इलेक्ट्रिशन म्हणून कार्यरत होते तर परेश हा खरेदी आणि विक्री विभागामध्ये होता. या गोष्टीला बराच काळ उलटला आहे. परेश आणि त्याची पत्नी मेघना दोहेही रोटरी क्लबचे सदस्य असून विशेष मुलांसाठी विविध उपक्रम राबवत होते.

त्यात अनेकदा ते मुलांना घेऊन फन स्कूलमध्ये येत होते. अपघाताच्या पूर्वी देखील आपल्या मुलांना खेळ घेण्यासाठी परेश फन स्कूल येथे आला होता. तेव्हा त्याची सुरेश बरोबर भेट झाली होती.

परंतु काही दिवसानंतरच परेशच्या निष्काळजीपणामुळे सुरेश, त्याची पत्नी भावना, अनुप करमाकर यांचा मृत्यू झाला तर शंकर हळर्णकर, वनिता भंडारी आणि राज माजगावकर गंभीर जखमी झाले आहेत.

दै. गोमन्तकने फन स्कूल व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता सुरेश फडते हे उत्तम कर्मचारी होते. या वर्षी ३१ जुलै रोजी ते सेवा निवृत्त झाले होते, परंतु त्यांची काम करण्याची शैली एवढी उत्तम होती की, व्यवस्थापनाने त्यांना एक वर्षाची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला होता.

हळर्णकर यांच्यावर दुसरी शस्त्रक्रिया

बाणस्तारी अपघातातील गंभीर जखमी झालेले शंकर हळर्णकर यांच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हळर्णकर यांच्या मणक्याला गंभीररीत्या दुखापत झाल्याने त्यांचे दोन्ही हात आणि एक पायाची हालचाल होत नव्हती.

शस्त्रक्रियेनंतर त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढण्यात आले आहे. त्यांच्यावर पहिली शस्त्रक्रिया १० ऑगस्ट रोजी केली होती. तर वनिता भंडारी धोक्यातून बाहेर असून स्थिर आहे. तिच्यावर देखील अनेक शस्त्रक्रिया झाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT