Banastarim Bridge Accident Dainik Gomantak
गोवा

Banastarim Bridge Accident: ‘सीट पोझिशन’ वरुन होणार घटनेचा उलगडा , कारचालक कोण हे लवकरच समजणार

बाणस्तारी अपघात : मेघना आणि मुलांची ‘न्यायवैद्यक’कडून चाचणी

गोमन्तक डिजिटल टीम

Banastarim Bridge Accident: बाणस्तारी येथे झालेल्या दुर्दैवी अपघाताला कारणीभूत ठरलेली ती आलिशान मर्सिडीज कार कोण चालवत होते? परेश सावर्डेकर की त्यांची पत्नी मेघना, याबद्दल अजूनही संभ्रम आहे.

ज्‍या दिवशी अपघात झाला, त्याक्षणी नेमके कोण कोणत्या सीटवर बसले होते, हे निश्चित करण्यासाठी आज मेघना आणि तिच्या तीन मुलांची ‘सीट पोझिशन’ चाचणी न्यायवैद्यक विभागाने घेतली.

निष्कर्ष ठरणार महत्त्वाचा

1 मेघना आणि तिच्या मुलांना आज मडगाव येथे आणण्यात आले होते. त्या सर्वांना एका गाडीतील वेगवेगळ्या सीटवर बसवले.

2 अपघाताच्या दिवशी गाडीला बसलेल्या जोरदार धक्क्याने अंगावर उमटलेल्या खुणा कुठल्या सीटवर बसलेल्या स्थितीत होऊ शकतात याची वेगवेगळ्या आयामांतून पडताळणी करून घेतली.

3 या सर्व प्रक्रियेचे छायाचित्रण करून घेण्‍यात आले आहे. त्‍यावर आधारित अहवाल तपास यंत्रणेला सादर केला जाईल.

मृत फडते दांपत्याच्या मुलाने केले छायाचित्रण

या चाचणीच्या छायाचित्रणासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून आज तीन छायाचित्रकारांना बोलावले होते. त्यात अपघातात ज्या फडते दांपत्याचा मृत्‍यू झाला, त्‍यांच्‍या पुत्राचा समावेश आहे. तो न्यायवैद्यक विभागात काम करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: त्रिकोणी प्रेमाचा रक्तरंजित शेवट: गर्भवती महिलेची चाकूने वार करून हत्या, खुनी आधीचा लिव्ह-इन पार्टनर, नंतर पतीने खुनीचा काढला काटा

Horoscope: हा आठवडा आव्हानात्मक! 'या' 3 राशींसाठी कामावर सावधगिरी आवश्यक, अन्यथा नुकसानं पक्कं

"माझे वडील वाचले, कारण रवी नाईक!" - मंत्री विश्वजीत राणे भावूक; Watch Video

Narkasur in Goa: नरकासुराला 'सायलंट' ब्रेक! रात्री 12 नंतर संगीत वाजवण्यावर पोलिसांचे निर्बंध

Ravi Naik: रवींना 'मगो'चे नेतृत्व मिळाले असते तर...?

SCROLL FOR NEXT