Banastarim Bridge Accident Dainik Gomantak
गोवा

Banastarim Bridge Accident: पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी मेघनाचा आटापिटा; पोलिस तपासात सहकार्य नाही

परेशला पुन्हा कोठडी की मिळणार जामीन?

गोमन्तक डिजिटल टीम

Banastarim Bridge Accident: बाणस्तारी अपघातप्रकरणी मर्सिडीस कारचा चालक परेश सावर्डेकर याला अटक केली असली तरी त्याची पत्नी मेघना सावर्डेकर हिने पोलिस चौकशीला सामोरे जावे लागू नये, यासाठी अटकपूर्व जामीन तसेच उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल होऊन पोलिसांचा ससेमिरा चुकविण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू केला आहे.

न्यायालयाने तिला अंतरिम जामीन देताना पोलिस तपासामध्ये सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, तिच्याकडून सहकार्य मिळत नाही. जबाबासाठी पोलिस तिला वारंवार समन्स पाठवत असल्याने ती अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संशयित परेश याची कोठडी आज (रविवारी) संपल्याने त्याला सोमवारी (१४ रोजी) फोंडा न्यायालयात कोठडी वाढवून घेण्यासाठी म्हार्दोळ पोलिस हजर करणार आहेत. त्याला पोलिस कोठडी मिळणार की न्यायालय कोठडी, हे सोमवारी निश्‍चित होणार आहे.

पोलिसांकडे दाद माग; मेघनाला सूचना

ही कार मेघना चालवत होती, यासंबंधीचे पुरावे अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. पोलिसांनी तिला चौकशीसाठी पोलिस स्थानकात उपस्थित राहण्याचे समन्स बजावले आहेत. त्यामध्ये पोलिसांनी तिची वैद्यकीय चाचणी, बोटांचे ठसे व काही प्रश्‍नांची उत्तरे हवी असल्याचे नमूद केले होते.

मात्र समन्स मिळताच उच्च न्यायालयात ते रद्द करण्यासाठी मेघनाने अर्ज केला आहे. न्यायालयाने त्याची दखल न घेता सुनावणीसाठी तारीख निश्‍चित केलेली नाही. तिला वरिष्ठ पोलिसांकडे यासंदर्भात दाद मागण्याची सूचना केली आहे.

दोघांची सुनावणी १६ रोजी

संशयित परेश सावर्डेकर याला फोंडा अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात गेल्या गुरुवारी (१० ऑगस्ट) धाव घेऊन त्यावर प्राधान्यक्रमाने सुनावणी घ्यावी, अशी विनंती त्याच्या वकिलांनी केली होती. मात्र, खंडपीठाने ती फेटाळून लावून १६ ऑगस्टला सुनावणी ठेवली आहे.

फोंडा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयानेही मेघना सावर्डेकर हिच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीवेळी अंतरिम जामीन देऊन मूळ अर्जावरील सुनावणी १६ ऑगस्टला ठेवली आहे.

या सुनावणीवेळी पोलिसांकडून तिच्या आडमुठेपणामुळे अटकपूर्व जामिनाला जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे. तिला समन्स बजावून तपासकामात सहकार्य केले नसल्याचे पुरावे न्यायालयात मांडले जाण्याची शक्यता आहे.

मुलांनीही घेतले पित्याचे नाव

पोलिसांनी साक्षीदारांच्या घेतलेल्या जबानीनुसार, अपघातावेळी मर्सिडीस कार संशयित परेश सावर्डेकर हा चालवत होता, हे समोर आले आहे. ज्या चारचाकी वाहनांना धडक बसली, त्यातील चालकांच्या जबान्या नोंदवल्या आहेत.

त्यात त्यांनी परेश याचेच नाव घेतले आहे. पोलिसांनी कारमालक मेघना आणि तिच्या तीन मुलांचा जबाब नोंदवला आहे. त्यामध्येही मुलांनीही आपले वडीलच कार चालवत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

जखमींची प्रकृती धोक्याबाहेर

बाणस्तारी अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. यातील दोघे जखमी गोमेकॉ इस्पितळात तर एकजण दंत इस्पितळात उपचार घेत आहे. ते पूर्णपणे धोक्याबाहेर आहेत. मात्र, त्यांना आणखी काही दिवस इस्पितळात उपचारासाठी राहावे लागणार असल्याची माहिती इस्पितळातील सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

SCROLL FOR NEXT