Banastarim Bridge Accident Dainik Gomantak
गोवा

Banastarim Bridge Accident: पालेकरांवरची कारवाई म्हणजे सेक्‍स स्‍कँडल प्रकरण झाकण्याचा प्रयत्‍न, विरोधकांचे टीकास्त्र

गोमन्तक डिजिटल टीम

Banastarim Bridge Accident कोणत्याही प्रकारचे फौजदारी खटले लिलया हाताळणारे म्हणून प्रसिद्ध असलेले आम आदमी पक्षाचे नेते ॲड. अमित पालेकर यांना झालेली अटक ही कधीतरी होणारच होती. त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले, एवढेच नव्हे तर ‘आप’ने त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले तेव्हाच सत्ताधाऱ्यांची वक्रदृष्टी त्यांच्याकडे वळली असावी.

आता बाणस्तारी अपघात प्रकरणात त्यांनी अक्कलहुशारी दाखवण्याचा केलेला प्रयत्न त्‍यांच्‍या अंगलट आल्याचे दिसत असले तरी पालेकर यांचा राजकीय प्रवास या कारवाईसाठी कारणीभूत ठरला नाही असे सांगितल्यास त्यावर कोणाचाही विश्‍‍वास बसणार नाही.

ॲड. पालेकर हे पूर्वी पत्रकार होते. काही वर्षे या व्‍यवसायात काढल्‍यानंतर ते वकील बनले. त्यांनी फौजदारी खटले हाताळण्यास सुरूवात केली. चर्चेत येणारे खटले ते लढवू लागले. कोणत्याही गुन्ह्यात अडकलेल्यास तुरुंगाबाहेर वा कोठडीबाहेर काढण्याची क्षमता, अशी आपली छबी त्‍यांनी तयार झाली.

त्यांची ही प्रतिमा ‘आप’ने हेरली आणि त्यांना राजकारणात आणले. तेही राजकारणात रमले आणि सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका करत सुटले. त्यांच्याजागी इतर कोणी असता तर तपास यंत्रणांचा ससेमिरा यापूर्वीच त्यांच्यामागे लागला असता, अशी चर्चा आहे.

मात्र पालेकर हे वकील, तेही कसलेले फौजदारी वकील. त्यामुळे त्यांच्याभोवती कारवाईचा फास आवळताना सारासार विचार करावा लागत होता. परिणामी त्यांच्याविरोधातील कारवाई पुढे पुढे जात गेली.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी प्रक्षोभक विधाने केली आहेत का, याची चाचपणी याआधी तपास यंत्रणांकडून करण्यात आली होती. तशी आगळीक त्यांच्याकडून घडली असती तर कारवाईची सज्जता ठेवण्यात आली होतीच.

मात्र ते कुठेही शब्दांत न सापडल्याने तपास यंत्रणांचे हात नेहमीच रिकामे राहिले. तसेच कोणत्याही आंदोलनात त्यांनी लक्ष्मणरेषा न ओलांडल्याने साधी प्रतिबंधात्मक अटक करण्याची संधीही त्‍यांनी दिली नाही.

बाणस्तारी पुलावर झालेल्‍या भीषण अपघात प्रकरणात पालेकर यांच्या नावाची चर्चा होती. चर्चा अनेक प्रकरणांत होते, पण त्यादृष्टीने सजग राहून पोलिस कारवाई करतातच असे नाही. अपघातानंतर उशिराने का होईना जाग आल्यासारखी पोलिस यंत्रणा जागी झाली.

त्यांनी पालेकरांच्‍या घरी जाऊन चौकशीसाठी आणले आणि अटक केली. या अटकेद्वारे सरकारने विरोधकांना त्‍यांच्‍या पद्धतीने संदेश देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सत्ताधाऱ्यांविरोधात जाणाऱ्या कितीही मोठ्या व्यक्तीपर्यंत पोलिसांचे हात पोचू शकतात असा हा संदेश आहे. विशेषत: एक मंत्री सेक्स स्कॅण्डलमध्ये अडकला की नाही हे सांगा, अशी विचारणा करणारे ट्विट करून गप्प बसलेले काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांच्यासाठी हा संदेश असल्याचे बोलले जात आहे.

चोडणकर यांचे ट्विट मंत्री व महिला पंचायत सदस्यांच्या बदनामीसाठी कारणीभूत ठरल्याचा संबंध जोडला गेल्यास त्यामुळे आश्चर्य नको.

सेक्‍स स्‍कँडल प्रकरणावरून लक्ष दुसरीकडे वळविण्‍याचा प्रयत्‍न

‘आप’चे नेते ॲड. अमित पालेकर यांना बाणस्तारी अपघात प्रकरणी करण्‍यात आलेली अटक ही राजकीय खेळी असल्याचा संशय येतोय. घटनेनंतर बराच वेळ लोटल्यानंतर पोलिसांनी केलेली ही अटक न पटण्‍यासारखी आहे.

सेक्‍स स्‍कँडल प्रकरणावरून दुसरीकडे लक्ष वळविण्‍याचा हा प्रयत्‍न आहे. प्रमुख विरोधी पक्षांच्या राज्य अध्यक्षांना लक्ष्य केले जात आहे. पोलिसांचा वापर राजकीय सूड उगवण्यासाठी केला जात असल्याचे दिसते. समजूतदार, सामाजिक-राजकीयदृष्ट्या जागरूक गोमंतकीय जनतेच्‍या नजरेतून हे सुटणार नाही.

लोकांना कायद्याच्या अंमलबजावणीच्या सर्व कृती आणि कार्यवाहीमध्ये पारदर्शकता, निष्पक्षता हवी आहे. जनतेची दिशाभूल केली जाऊ शकत नाही, अशा शब्‍दांत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्‍यक्त केली.

बाणस्तारी अपघात प्रकरणातील सबळ पुरावे गोळा करून दोषींवर कारवाई व्हावी याची दक्षता घेणे हे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे कर्तव्य आहे. सुरूवातीपासूनच ॲड. अमित पालेकर त्यांच्या रडारावर होते. त्यामुळे तपासाबाबत संशय घेण्यास जागा आहे.

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

आम आदमी पक्षाचे नेते ॲड. अमित पालेकर यांच्या अटकेचा आम्ही निषेध करतो. त्यांची अटक ही बाणस्तारी अपघात प्रकरणात पोलिस खाते अपयशी ठरल्याचे दर्शवते. ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य करण्याचा हा प्रयत्न आहे.

- अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर कुटुंबियांसह रात्रीचा प्रवास सुरक्षित आहे का? काय सांगतात प्रवासी

Goa Today's News Live: जीप संघटना दूधसागर पर्यटन हंगामाच्या विरोधात ठाम!

Ranji Cricket Tournament: अर्जुन तेंडुलकरसह हेरंब, शुभमचा भेदक मारा, सुयश आणि रोहणचं 'तूफान'; सिक्कीमचा संघ पत्त्यासारखा ढासळला !

गोव्याच्या भूमीत विकसित झालेली 'श्वेतकपिला' गाय; सरकारने राजाश्रय देण्याची गरज

Pernem Punav Utsav: पेडणेतील प्रसिद्ध 'पुनव' उत्सव उत्साहात साजरा! पावसामुळे हिरमोड; भाविकांच्या संख्येवर परिणाम

SCROLL FOR NEXT