Goa Banana Production Dainik Gomantak
गोवा

Goa Banana Production: राज्यात नारळ, काजूपाठोपाठ केळीचे बंपर उत्पादन! तरीही महाराष्ट्र-कर्नाटकातून का करावी लागतेय आयात?

Banana Imports In Maharashtra & Karnataka: राज्यात नारळ आणि काजू यासोबतच केळ्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ५० टक्के केळी लागवड ही बागायती पिकांमध्ये अंतर्गत पीक म्हणून केली जाते.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात नारळ आणि काजू यासोबतच केळ्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ५० टक्के केळी लागवड ही बागायती पिकांमध्ये अंतर्गत पीक म्हणून केली जाते. माड, पोफळी आणि इतर बागायती पिकांमध्येही केळींची लागवड देखील होते.

राज्यातील एकूण उत्पादनाचा आढावा घेतल्यास सत्तरी (Sattari) तालुक्यात सर्वाधिक ५ हजार ९८३ टन इतके उत्पादन घेण्यात येते. राज्यात एकूण २,५१० हेक्टर क्षेत्रफळात केळी लागवड करण्यात आली असून राज्यात सुमारे २९ हजार ७०५ टन इतके केळीचे उत्पादन घेण्यात येते; परंतु याहून कित्येक अधिक पट केळी शेजारील कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातून आयात केली जातात.

सत्तरी तालुक्यानंतर सर्वाधिक केळी उत्पादन हे केपे तालुक्यात ५,८५८ टन उत्पादन घेण्यात आले आहे. केपेतील ५२८ हेक्टर क्षेत्रफळ केळी लागवडीखाली आहे. फोंड्यात ४,५०८ टन, डिचोलीत ३,६०० टन, तिसवाडीत ३६० टन, बार्देशात १,२७३ टन, पेडणेत ९२१ टन, सांगेत २,०२५ टन, धारबांदोड्यात १,०१४ टन, काणकोणात २,७४२, सासष्टीत १,०८२ आणि मुरगाव येथे ३३९ टन इतके केळीचे उत्पादन घेण्यात आले.

भाजीपाला दरवाढीचा भडका कायम

राज्यात कांदे आणि टोमॅटोच्या दरात वाढ झाली असून पणजी बाजारात कांदे ४० रुपये तर टोमॅटो ५० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. इतर पालेभाज्या पन्नास रुपयांना ३ जुड्या दराने विकल्या जात आहेत.

पणजी (Panaji) बाजारात कोबी ५० रुपये किलो, गाजर ८० रु., हिरवी मिरची ८० रु., भेंडी ८० रु. दराने विकली जात आहे. आले २०० ते २५० रुपये आणि लसूण ३०० ते ४०० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. मक्याची कणसे शंभर रुपयांना पाच नग, रताळी ६० रु. किलो, शेंगा १०० रु. किलो दराने विकल्या जात असून सध्या फळांच्या दरातही काही प्रमाणात वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वास्कोत भररात्री गोंधळ! प्रार्थनास्थळी दानपेटी फोडली, मूर्तीचे नुकसान, अंतर्वस्त्रे घालून फिरणाऱ्या व्यक्तीवर संशय; कोण आहे हा 'अर्धनग्न' संशयित?

Cooch Behar Trophy: कल्याणी मैदानात रंगला सामना! बंगालविरुद्ध गोव्याचा डाव गडगडला, आता आराध्य-व्यंकट यांची जोडीच तारणहार!

IPL 2026 Auction: दमदार कामगिरीचं फळ! सुयश, ललित अन् अभिनव आयपीएल लिलावात; गोव्याच्या त्रिकूटावर सर्वांच्या नजरा

Zilla Panchayat Election: 'मागच्या दरवाजानं काँग्रेसमध्‍ये कुणालाही प्रवेश दिला नाही', जिल्हाध्यक्षांनी स्पष्टचं सांगितलं; सासष्टीतील पाचही जागांसाठी अर्ज दाखल

Zilla Panchayat Election: धारगळ मतदारसंघात काँग्रेसमध्‍ये उफाळला कलह, ऐनवेळी ज्ञानेश्‍‍वर शिवजी यांना उमेदवारी नाकारल्‍याने बंडाचा सूर

SCROLL FOR NEXT