arrested Dainik Gomantak
गोवा

Goa Religious Tension: बागा खाडीजवळ प्रार्थनास्थळाची विटंबना, धार्मिक मूर्ती हटवून ठेवले झाड; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Goa Religious Disturbance: बागा खाडीजवळ (Baga Creek) एक अत्यंत धक्कादायक आणि तणावपूर्ण घटना घडली. एका अज्ञात व्यक्तीने स्थानिक प्रार्थनास्थळाचे (चॅपलचे) कुलूप तोडून ते समुद्रात फेकून दिले.

Manish Jadhav

Goa Religious Disturbance: बागा खाडीजवळ (Baga Creek) एक अत्यंत धक्कादायक आणि तणावपूर्ण घटना घडली. एका अज्ञात व्यक्तीने स्थानिक प्रार्थनास्थळाचे (चॅपलचे) कुलूप तोडून ते समुद्रात फेकून दिले. इतकेच नाहीतर आतील मूर्ती बाहेर काढून त्यांच्या जागी एक झाड ठेवल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला, ज्यामुळे परिसरात तीव्र निदर्शने आणि भावनिक उद्रेक झाला.

स्थानिक नागरिकांचा संताप आणि निषेध

दरम्यान, या विटंबनेच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. प्रार्थनास्थळाची अशा प्रकारे विटंबना केल्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांनी या कृत्याचा तीव्र संताप व्यक्त करत निषेध नोंदवला. परिसरातील वातावरण काही काळ अत्यंत तणावपूर्ण बनले. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवून कारवाईची मागणी केली.

हणजूण पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत

त्याचवेळी, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हणजूण पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. पोलीस निरीक्षक (PI) सुरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक (PSI) साहिल वारंग आणि साईश शेटगावकर यांच्या पथकाने तत्परता दाखवत तपास सुरु केला. घटनेच्या अवघ्या एका तासाच्या आत पोलिसांनी संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. यामुळे स्थानिकांचा काही प्रमाणात रोष कमी होण्यास मदत झाली.

परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला; पुढील तपास सुरु

घटनेनंतर परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी, बागा खाडी परिसरातील पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सतर्क आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयित व्यक्तीची चौकशी सुरु असून, या घटनेमागील नेमका उद्देश काय होता, याचा गोवा पोलीस (Goa Police) कसून तपास करत आहेत. धार्मिक भावना दुखावल्याच्या या प्रकारामुळे गोव्यात पुन्हा एकदा संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: अळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांना विषबाधा, जीएमसीत उपचार सुरु; मये-डिचोलीतील घटना

Viral Video: 'पप्पा पोलीसमध्ये आहेत, गोळी घालेन...', होमवर्क दिल्यावर चिमुकल्याची थेट शिक्षिकेला धमकी; 'लिटिल डॉन'चा व्हिडिओ व्हायरल!

New Mahindra SUV: टोयोटाची झोप उडवणार महिंद्राची नवी पिकअप! स्कॉर्पिओ आणि थारचं जबरदस्त कॉम्बिनेशन

गोव्याच्या दारूवर महाराष्ट्राचे लेबल; तेलाच्या नावाखाली सुरु होती तस्करी, वैभववाडीत 41 लाखांचा मुद्देमाल जप्त

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये जो रुट गाठणार नवा 'माइलस्टोन'! 22 धावा करताच रचणार इतिहास

SCROLL FOR NEXT