Baga Calangute Demolition Drive Dainik Gomantak
गोवा

बागा-कळंगुटमध्ये चालला बुलडोझर! 17 बेकायदा बांधकामे जमीनदोस्त, पर्यटन खात्याच्या जागेतील अतिक्रमणे हटवली; बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई

Baga Calangute Demolition Drive: बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी कठोर पाऊल उचलत, बागा-कळंगुट येथील पर्यटन खात्याच्या जागेतील सतरा बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त केली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी कठोर पाऊल उचलत, बागा-कळंगुट येथील पर्यटन खात्याच्या जागेतील सतरा बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यातील अनेक वास्तूंचे मालक किंवा भाडेकरू गेल्या अनेक दशकांपासून पर्यटन खाते आणि इतर प्राधिकरणांशी न्यायालयीन लढा देत होते.

मात्र, मंगळवारी अचानक झालेल्या या कारवाईमुळे सर्वांनाच धक्का बसला. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली जात आहे. बागा येथील एकूण १७ अनधिकृत बांधकामे पाडण्याचे निर्देश दिले असून, त्यापैकी काही बांधकामे सीआरझेड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जमीनदोस्त करण्यात येत आहेत. या मोहिमेवेळी पर्यटन विभागाचे अधिकारी आणि कळंगुट पोलिसांचा मोठा ताफा तैनात होता. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कळंगुट पंचायतीचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी सांगितले की, या पाडकामाबाबत पंचायतीला कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती.

परप्रांतियांवरही कारवाई हवी

स्थानिक व्यावसायिकांनी या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. केवळ स्थानिकांना लक्ष्य केले जात असून, सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या परप्रांतीयांवर मात्र कोणतीही कारवाई होत नाही, असा आरोप काही भागधारकांनी यावेळी केला.

...तर हे अतिक्रमण झालेच नसते!

सुमारे १० वर्षांपूर्वी पर्यटन खात्याने ५० हजार चौरस मीटर जागेवरील अतिक्रमणे हटवून जीटीसीडी पार्किंग आणि फूड कोर्टसाठी जागा मोकळी केली होती. मात्र, बागा किनाऱ्याच्या अगदी जवळ असलेली काही प्रसिद्ध रेस्टॉरंट्स (Restaurants) आणि दुकाने तशीच राहिली होती. मात्र, मंगळवारी या बांधकामांना लक्ष्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli World Record: विराट कोहलीची अवघ्या 7 धावांची खेळी, पण रिकी पाँटिंगचा विश्वविक्रम मोडला! न्यूझीलंडविरुद्ध बनला नंबर 1 फलंदाज

VIDEO: डिचोलीत भीषण अपघात; जिममधून घरी परतताना दुचाकीवरील नियंत्रण सुटलं, 22 वर्षीय तन्मयचा उपचारादरम्यान मृत्यू

Goa Pollution Control Board: धारबांदोड्यातील हॉटमिक्स प्रकल्प सुरू करण्यास मनाई, उच्च न्यायालयाचा दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीला आव्हान

Women’s T20: श्रेया परबची नाबाद 52 धावांची झुंज व्यर्थ; महाराष्ट्राने गोव्याला 12 धावांनी नमवले

Viral Video: मोबाईल ठेवायला जागा नाही म्हणून थेट चाकू बाहेर काढला! ट्रेनमधील तरुणाच्या कृत्याने प्रवासी संतप्त, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT