BJP che Burak  Dainik Gomantak
गोवा

Goa Bad Roads: 1400 कोटी खर्च, पण रस्त्यावर खड्डेच; 'बीजेपीचे बुराक' मोहिमेत पालेकरांची टीका; रस्त्यांवर बसून केले आंदोलन

BJP che Burak: नेवगीनगर-मळा येथील सांताक्रूझकडे जाणाऱ्या मार्गावरील खड्ड्यांजवळ बसून आपच्या नेत्यांनी आंदोलन केले. प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

Sameer Panditrao

पणजी: राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात आम आदमी पक्षाच्यावतीने ‘बीजेपीचे बुराक'' ही मोहीम रविवारी सुरुवात पणजीतून केली. नेवगीनगर-मळा येथील सांताक्रूझकडे जाणाऱ्या मार्गावरील खड्ड्यांजवळ बसून आपच्या नेत्यांनी आंदोलन केले. प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. अशा प्रकारे ‘आप’ने अनोखा विरोध दर्शविला.

याप्रसंगी राजेश कळंगुटकर, श्रीकृष्ण परब, सुनील सिंगणापूरकर व इतर कार्यकर्त्यांचा सहभाग होता. पालेकर म्हणाले, अजूनही आपने गावभर ही मोहीम सुरू केली नाही. परंतु पणजीत १४०० कोटी रुपये स्मार्ट सिटीसाठी खर्च केले, पण रस्त्यावर खड्डेच आहेत. आपण इमेजीन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालकांना (एमडी) संपर्क साधला, पण त्यांनी आपला फोन काही स्वीकारला नाही.

सार्वजनिक बांधकाम खाते, नगर विकास खाते, आयपीएससीडीएलने १ हजार ४०० कोटी विभागून खर्च केले, ते गेले कुठे? हे भाजपचे खड्डे म्हणून जी मोहीम सुरू केली आहे, त्यामुळे ताळगावातील आमदार बाबूश मोन्सेरात सक्रिय झाले असून, त्यांनी ताळगाव मतदारसंघातील खड्डे भरण्याचे कामही सुरू केले आहे. पण पणजीतील खड्डे काही त्यांना दिसेनात असे दिसते. पणजीतही बरेच खड्डे आहेत, ते आम्ही दाखवणार आहोत.

ते पुढे म्हणाले, नेवगीनगरमधून भाटलेतून तांबडीमातीकडे जाणारा रस्ता काय स्थिती झाली आहे, हे त्यावरून दिसते. पणजीत अजूनही खड्डे दिसतात ही राज्य सरकारची नाचक्की आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरुवस्था झाली आहे. आम्ही सुरू केलेले आंदोलन हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे.

निष्काळजीपणा

राज्यातील विविध रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. भाजप सरकारचा निष्काळजीपणा तसेच भ्रष्ट कारभारामुळे रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत. त्याविरोधात आम आदमी पार्टीने ‘हॅशटॅग बीजीपीचे बुराक’ ही राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे. येथील ‘आप’च्‍या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर, कार्याध्यक्ष वाल्मिकी नाईक, सरचिटणीस (प्रचार) संदेश तेलेकर, उपाध्यक्ष रॉक मास्कारेन्हास यांची उपस्थिती होती. अमोल पालेकर म्हणाले, पक्षाकडे येणारी छायाचित्रे पक्षाच्या संकेतस्थळावर अपलोड केली जातील आणि त्याद्वारे सरकारवर दबाव निर्माण केला जाईल. नागरिकांनी आपापल्या भागातील खड्ड्यांची छायाचित्रे ७०४५१७०४५१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर छायाचित्रे पाठवावीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: 'तुम हारने लायक ही हो...' आफ्रिकेविरूध्द टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, दिग्गज खेळाडूची पोस्ट व्हायरल

'IFFI 2025' मध्ये गोव्यातील 2 चित्रपटांना संधी! मिरामार, वागातोर किनाऱ्यांसह मडगावच्या रविंद्र भवनात 'Open-air Screening' ची मेजवानी

Goa Police: 5000 पेक्षा अधिक कॉल, 581 तक्रारींवर तत्काळ कार्यवाही; सायबर गुन्ह्यांना 100% प्रतिसाद देणारं 'गोवा पोलीस' दल देशात अव्वल

आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचा डंका! वास्कोच्या मेघनाथने दुबईत जिंकली 2 रौप्य पदके; मेन्स फिटनेस स्पर्धेत वाढवला देशाचा मान

Viral Video: नवी कोरी थार काही दिवसांत बंद पडली; मालकाने गाढवं बांधून, ताशा वाजवत कार शोरुमला ओढत नेली, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT