Goa: Jayant Kamat Publishing Website Of Sai Mandir Avede-Bori. Dainik Gomantak
गोवा

Goa: बोरीतील साईमंदिरच्‍या वेबसाईटचे लोकार्पण

Goa: साईबाबा सेवामंडळ ट्रस्टने सुरू केलेल्या वेबसाईटचे लोकार्पण करण्‍यात आले.

Ramesh Vaskar

बोरी : आवेडे-बोरी (Avede, Bori-Goa) येथील पश्‍चिम शिर्डी म्हणून गणल्या जाणाऱ्या श्री साईबाबांची कीर्ती आता देशभर पसरली आहे. आता वेबसाईटच्या माध्यमातून साईमंदिरातील सर्व कार्यक्रम साईभक्तांना घरी बसून बघण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर यांनी केले.

पहिल्‍या श्रावणी गुरुवारी (दि. १२) साईबाबा सेवामंडळ ट्रस्टने साईबाबा मंदिरातील सर्व कार्यक्रम आणि मंदिराची माहिती राज्याबरोबरच देशभरातील भाविकांना व्हावी या उद्देशाने सुरू केलेल्या वेबसाईटच्या उद्‍घाटन समारंभात ॲड. सावईकर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून साईभक्त जयंत कामत, उद्योजक आशुतोष खांडेकर, उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक, उद्योजक अनिल नाईक, अमित कामत, मनस्वी खांडेकर, वन्‍सिका शिरोडकर, या उत्सवाचे यजमान सचिन बोडके, ट्रस्टचे अध्यक्ष नारायण नाईक, उपाध्यक्ष दीपक रायकर, सचिव अक्षय नाईक, मुकेश नाईक, गुरुदास नाईक, श्रीकांत नाईक, देऊ नाईक, गोकुळदास नाईक, आनंद नाईक, नारायण नाईक, वासुदेव नाईक, उमेश बोरकर, रघू नाईक, रमाकांत बोरकर, जि.पं. सदस्य दीपक नाईक बोरकर, माजी सरपंच संजय गावडे, श्‍‍याम नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

जयंत कामत यांनी उपक्रमाला शुभेच्छा व्यक्त केल्‍या. कामत याच्या हस्ते पारंपरिक समई प्रज्वलित करून आणि बटन दाबून वेबसाईटचे लोकार्पण झाले. यावेळी वेबसाईट बनवणारे लॅन डायस, आदर्श गावकर, दर्शन नाईक, तुषार आमोणकर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष नारायण नाईक यांच्या हस्ते पाहुण्यांना शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अध्यक्ष नारायण नाईक यांनी स्वागत केले. रमेश वंसकर यांनी सूत्रसंचालन केले. सचिव अक्षय नाईक यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Candolim: पैसे घेतले एकाकडून, जमीन विकली दुसऱ्याला! मुंबईच्या कंपनीला 8 कोटींचा गंडा; गोव्यातील चौघांसह पाचजणांविरुद्ध गुन्हा नोंद

Goa Tourism: गोव्याचे किनारे 'दलालमुक्त' होणार! पर्यटनमंत्री खंवटेंचा निर्धार; हंगामाच्या प्रारंभी पर्यटक वाढल्याचा दावा

Kerala Foundation Day: निसर्ग सौंदर्यानं नटलेली अन् भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी; 'गॉड्स ओन कंट्री' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळचा स्थापना दिवस

Pro Kabaddi League Final 2025: दबंग दिल्ली पुन्हा कबड्डी 'चॅम्पियन'! जिंकला PKL 12चा किताब; फायनलमध्ये पुणेरी पलटनची कडवी झुंज अपयशी

Raigad Fort: मराठ्यांच्या शौर्याचा साक्षीदार, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी; 'किल्ले रायगड'

SCROLL FOR NEXT