Goa Assembly Monsoon Session 2023 CM Sawant   Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session: विधवांना मिळणार महिन्याला 4 हजार; दोन नवीन योजनांची केली घोषणा

आमदार गणेश गावकर यांनी विधवा महिलांना पेन्शन मिळावी, ही लक्षवेधी सूचना मांडली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Monsoon Session राज्यातील गृहआधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना पतीच्या निधनानंतर दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचाही (डीएसएसवाय) लाभ मिळणार असून ती रक्कम 2,500 रुपये असणार आहे. त्यामुळे गृहआधारचे दीड आणि डीएसएसवायचे अडीच असे चार हजार रुपये विधवा महिलेस मिळतील.

यासंबंधीची फाईलमध्ये काही त्रुटी होत्या, त्या वित्तखात्याकडून त्वरित केल्या जातील आणि ही योजना जेवढ्या लवकर अमलात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले.

आमदार गणेश गावकर यांनी विधवा महिलांना पेन्शन मिळावी, ही लक्षवेधी सूचना मांडली होती. समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सभागृहात सांगितले, 18 वर्षांखालील मुले असलेल्या विधवा महिलांनाच याचा लाभ मिळेल. डीएसएस अंतर्गत विधवा लाभार्थ्यांना गृहआधार अंतर्गत दीड हजार रुपये देण्यास सरकारने तत्त्वतः मान्यता दिली आहे.

विधवा निवृत्ती वेतन म्हणून त्यांना अडीच हजार रुपयेही मिळतील, असे त्यांनी सांगितले. मंत्री म्हणाले, ही फाईल वित्त विभागाकडे प्रलंबित आहे आणि राज्यावर अतिरिक्त बोजा पडण्याबाबत प्रश्न उपस्थित केला.

तथापि, हा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सरकारला लाडली लक्ष्मी आणि गृह आधार योजनांसाठी अर्जांचा मोठा अनुशेष दूर करून लाभार्थ्यांना प्राधान्याने रक्कम वितरित करण्याची विनंती केली.

ज्या उद्देशासाठी दोन्ही योजना तयार करण्यात आल्या होत्या, तो उद्देश रक्कम देण्यास विलंब झाल्यास बाजूला राहील, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gautam Gambhir: गौतम गंभीरची हकालपट्टी होणार का? BCCI सचिवांनी दिलं थेट उत्तर; म्हणाले 'त्यांना काढून टाकण्याची बातमीच...'

Ponda Accident: फोंड्यात वातावरण पेटले! डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; संतप्त नागरिकांनी वाहतूक रोखली, ट्रकची केली नासधूस

Cigarette Price Hike: सिगारेट ओढणाऱ्यांसाठी चटका देणारी बातमी! 4 पटीने वाढणार किंमत; धूम्रपान करणाऱ्यांना सरकारचा मोठा धक्का

Rohit Sharma Viral Photo: 'मी रोहित शर्मासारखा दिसतोय हे ऐकून.. ', हिटमॅनसारख्या दिसणाऱ्या खेळाडूने जिंकले फॅन्सचे हृदय; पहा Video

Goa Dhirio: कोलवामध्ये पुन्हा 'धिरिओ'चा थरार; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्राणीमित्रांकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT