Ramesh Tawadkar  Dainik Gomantak
गोवा

काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेवर काय म्हणाले सभापती तवडकर?

अपात्रतेचा निर्णय अधिनेशनानंतरच; गोवा विधानसभा सभापती रमेश तवडकरांचं स्पष्टीकरण

आदित्य जोशी

पणजी : सध्या गोव्यात काँग्रेस आमदारांच्या बंडामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यानंतर काँग्रेसकडून मायकल लोबो यांना विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरुन काढण्यात आलं. तसंच लोबो आणि दिगंबर कामत यांच्या आमदार अपात्रतेची याचिकाही काँग्रेसकडून दाखल केल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र विधानसभा सभापती रमेश तवडकर यांनी आता या याचिका प्रकरणावर भाष्य केलं आहे.

गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी कळंगुटचे आमदार मायकल लोबो आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्याविरोधात आमदार अपात्रता याचिका दाखल केल्याचं सांगितलं होतं. मात्र आता सभापती तवडकर यांनी अशाप्रकारची याचिका आपल्याला मिळाली असल्याचे स्पष्ट केलं आहे. तसंच तशी याचिका आलीच तर त्यावर अधिवेशनानंतर निर्णय घेतला जाणार असल्याचंही तवडकर यांनी स्पष्ट केलं आहे.

आमदार दिगंबर कामत आणि मायकल लोबोंविरोधात गोवा विधानसभेच्या सभापतींसमोर प्रदेश काँग्रेस अपात्रता याचिका दाखल करणार असल्याचं वक्तव्य काल सोमवारी गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केलं होतं. दोन्ही नेत्यांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

यासोबतच काँग्रेसकडून मायकल लोबोंना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवण्यात आल्याचंही जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे सभागृहातील काँग्रेस आमदारांची आसनव्यवस्था बदलण्याची विनंती प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि सहा आमदारांनी सभापती रमेश तवडकर यांना केली होती. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसकडून दोन्ही नेत्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सध्या गोव्यात सुरु आहे. असं असलं तरी दोन्ही नेत्यांनी पक्षाच्या या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत आपण पक्ष बदलला नसून अजूनही आपण काँग्रेसमध्येच असल्याचं स्पष्ट केलं होतं. इतकंच नाही तर दोन्ही नेते सभागृहात आपापल्या जागीच बसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर सारंकाही आलबेल नसल्याचंच एकंदर चित्र समोर आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: '..तर मी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतणार नाही'! कोहलीच्या विधानाने चाहत्यांना धक्का; तुफानी फटकेबाजीबद्दल म्हणाला की..

CM Pramod Sawant: ‘कशे आसात दोतोर?’ मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी साखळीत गर्दी; आरोग्याची केली विचारपूस

Ponda By Election: फोंड्यात राजकीय ‘पारा’ वाढू लागला! भाजप-काँग्रेस आक्रमक; लैंगिक शोषण प्रकरणाचाही मुद्दा

Indigo Flights: गोव्‍यातून इंडिगोची 6 शहरांची विमानसेवा स्‍थगित! गोमंतकीयांना फटका बसण्‍याची शक्‍यता; 'हे' कारण आले समोर

Ponda By Election: फोंड्यात मुख्यमंत्र्यांसह पाटकर मैदानात! भाजपचा डोळा परप्रांतीय मतांवर; स्मार्ट सिटी बनविण्याची ग्वाही

SCROLL FOR NEXT