Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: सभापतिपदासाठी विरोधकांतर्फे काँग्रेस पक्षाचे एल्‍टन डिकॉस्‍टा, अर्ज सादर; विजय सरदेसाई, वीरेश बोरकरांच्या अनुपस्‍थितीमुळे चर्चा

Goa assembly speaker election: राज्‍य विधानसभेच्‍या सभापतिपदासाठी विरोधकांतर्फे काँग्रेसचे आमदार एल्‍टन डिकॉस्‍टा यांनी बुधवारी विधानसभा सचिव नम्रता उल्‍मन यांच्‍याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

Sameer Amunekar

पणजी: राज्‍य विधानसभेच्‍या सभापतिपदासाठी विरोधकांतर्फे काँग्रेसचे आमदार एल्‍टन डिकॉस्‍टा यांनी बुधवारी विधानसभा सचिव नम्रता उल्‍मन यांच्‍याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस आणि ‘आप’चे आमदार उपस्‍थित होते. मात्र, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई आणि ‘आरजी’चे आमदार वीरेश बोरकर अनुपस्‍थित राहिले.

रमेश तवडकर यांनी काही दिवसांपूर्वी सभापतिपदाचा राजीनामा देत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्‍यामुळे हे पद रिक्त आहे.

नव्‍या सभापतींची निवड करण्‍यासाठी येत्‍या २५ सप्‍टेंबर रोजी निवडणूक घेण्‍यासंदर्भातील समन्‍स काहीच दिवसांपूर्वी राज्‍यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी जाहीर केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्‍यासाठी २४ सप्‍टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतची मुदत देण्‍यात आली आहे.

दरम्‍यान, विधानसभेत भाजपकडे सध्‍या ३३ आमदारांचे बळ असून, विरोधात केवळ सात आमदार आहेत. त्‍यामुळे भाजप उमेदवाराचा विजय निश्‍चित मानला जात असतानाच लोकशाहीचे पावित्र्य राखण्‍यासाठी विरोधकही आपला उमेदवार देतील, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी जाहीर केले होते.

त्‍यानुसार अर्ज सादर करण्‍यात आला. यावेळी युरी आलेमाव यांच्‍यासह आमदार कार्लुस फेरेरा, ‘आप’चे व्‍हेंझी व्‍हिएगस व क्रुझ सिल्‍वा उपस्‍थित होते.दरम्‍यान, भाजपने मात्र अजूनही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT