MLA Nilesh Cabral And Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: सभापतीने बंदी घातली अन् सत्ताधारी आमदाराच आला काळ्या कपड्यात, विजय सरदेसाईंनी संधी साधली

Goa Assembly Monsoon Session 2024: विधानसभा प्रवेशद्वारावर काळ्या वस्त्रांचा ढीग पाहायला मिळाला.

Pramod Yadav

गोवा विधानसभा अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु आहे. अधिवेशन सुरु असताना सभागृहात येणाऱ्या पत्रकार, विद्यार्थी आणि अभ्यागतांना काळी कपडे परिधान करुन येण्यास बंदी घातली.

सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना काळी वस्त्रे काढून ठेवण्यास लावण्यात आली. मंगळवारी सत्ताधारी आमदार काळी कपडे घालून आल्याने आमदार विजय सरदेसाईंनी संधी साधत सरकारवर टोमणा मारला.

अधिवेशन सुरु असताना सभागृहात येणाऱ्या पत्रकार, अधिवेशन कामकाज पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थी आणि अभ्यागतांना त्यांच्या अंगावरील काळी वस्त्रे काढून ठेवण्यास लावली. यात अंगावर काळे जॅकेट असले तरी काढून ठेवण्यास लावले. विधानसभा प्रवेशद्वारावर काळ्या वस्त्रांचा ढीग पाहायला मिळाला.

दरम्यान, मंगळवारी कामकाजादरम्यान सत्ताधारी पक्षाचे आमदार माजी मंत्री निलेश काब्राल हेच काळे कापडे परिधान करुन आल्याचे दिसून आले. प्रश्नोत्तराच्या काळात काब्राल यांनी राज्यातील जमीन हडप प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला.

यात त्यांनी एसआयटी तपास करत असताना प्रकरण कोर्टाकडे का पाठवले जात आहे आणि ते कोणत्या कोर्टाकडे पाठवले जात आहे? याबाबत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी प्रश्न विचारले.

काब्राल यांचा प्रश्न संपल्यानंतर आमदार विजय सरदेसाई प्रश्न विचारण्यासाठी उभे राहिले असता त्यांनी काब्राल यांच्या काळ्या कपड्यांवरुन सरकारवर निशाना साधला. डबल इंजिन सरकार व्यवस्थित चालेना म्हणून निषेधार्थ काब्राल काळे कपडे घालून आल्याचा टोमणा सरदेसाईंनी मारला.

प्रश्नोत्तराच्या काळात मंगळवारी नवीन बोरी पुलाबाबत बाधित होणाऱ्या घरांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना पुलासाठी एकही घर पाडले जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. तसेच, जमीन हडप प्रकरणावरुन सत्ताधारीसह विरोधी बाकावरील आमदारांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री प्रमोद सावंत यांना धारेवर धरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT