पहिले बक्षीस 2BHK आणि 27 लाख रुपये! गोव्यातील गणेशोत्सवाची दीड कोटींची बक्षीसं तुम्हाला आश्चर्यचकीत करतील

Goa Ganesh Mandal Lottery: सांगे तालुक्यातील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आगामी गणपती उत्सवासाठी कुपन जाहीर केले आहेत.
पहिले बक्षीस 2BHK आणि 27 लाख रुपये! गोव्यातील गणेशोत्सवाची दीड कोटींची बक्षीसं तुम्हाला आश्चर्यचकीत करतील
Ganesh Chaturthi 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात देखील मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. गोव्यातील गणेशोत्सव अनेक कारणांनी प्रसिद्ध आहे. त्यातील एक महत्वाचे कारण म्हणजे यानिमित्ताने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा, लॉटरी आणि त्याची बक्षीसे.

यावर्षी देखील एका मंडळाने जाहीर केलेली बक्षीसं तुम्हाला आश्चर्यचकीत केल्याशिवाय राहणार नाहीत.

सांगे तालुक्यातील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आगामी गणपती उत्सवासाठी कुपन जाहीर केले आहेत. समाजमाध्यमांवर सध्या या मंडळाचे प्रसिद्धीपत्रक व्हायरल होत आहे. या पत्रकात मंडळाने जाहीर केलेल्या बक्षिसांची यादी देण्यात आली आहे.

अशी आहेत बक्षीसं!

पहिले बक्षीस - 2BHK आणि 27 लाख रोख रक्कम

दुसरे बक्षीस - टाटा प्राईमो दहा चाकी वाहन आणि 21 लाख रोख रक्कम

तिसरे बक्षीस - टाटा हिटाची आणि 14 लाख रोख रक्कम

चौथे बक्षीस - महिंद्रा थार आणि 6.65 लाख रोख रक्कम

पाचवे बक्षीस - नेक्सॉन (डिझेल) आणि 4.70 लाख रोख रक्कम

सहावे बक्षीस - टाटा पंच (ईव्ही) आणि 4.70 लाख रोख रक्कम

पहिले बक्षीस 2BHK आणि 27 लाख रुपये! गोव्यातील गणेशोत्सवाची दीड कोटींची बक्षीसं तुम्हाला आश्चर्यचकीत करतील
Bicholim News : डिचोलीत ६० हेक्टरांतील रोपे कुजली; शेतकऱ्यांना मोठा फटका

सात ते अकरा पर्यंतच्या विजेत्यांना टाटा टियागो (ईव्ही) आणि साडे तीन लाख रोख रक्कम

तर, बारा ते 21 पर्यंतच्या विजेत्यांना TVS ची एनटॉर्क आणि होंडाची डिओ तसेच 50 हजार रुपयांची रोख रक्कम दिली जाणार आहे. अशी एकूण एक कोटी 46 लाख रुपयांची बक्षीसे वाटप केली जाणार आहेत.

पहिले बक्षीस 2BHK आणि 27 लाख रुपये! गोव्यातील गणेशोत्सवाची दीड कोटींची बक्षीसं तुम्हाला आश्चर्यचकीत करतील
Goa Assembly: बनवाट 'गोवा काजू' विकल्याप्रकरणी 23 जणांवर कारवाई; तब्बल एवढ्या लाखांचा दंड वसूल; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मागील वर्षी देखील केपे तालुक्यात एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मोठ्या प्रमाणावर बक्षीसे जाहीर केली होती. याचे तिकीट घेण्यासाठी मोठी झुंबड पाहायला मिळाली होती. यावरुन वादाने देखील तोंड वर काढले होते. अखेर बक्षीस वाटपादरम्यान पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com