Vijay Sardesai | Goa Monsoon Assembly 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session: कला अकादमीनंतर क्रीडा स्पर्धेवरुन विरोधकांनी सरकारला घेरले

सरकारकडून बोळवण : ‘स्मार्ट सिटी’ची न्यायालयीन चौकशी करा : विरोधकांची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Monsoon Session कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले क्रीडामंत्री गोविंद गावडे आता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या खर्चावरून पुन्हा विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य बनले आहेत.

गोव्यात होऊ घातलेली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ‘कॉमनवेल्थ’प्रमाणेच भ्रष्टाचारात अडकली असून या स्पर्धेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याने त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी आज सभागृहात लावून धरली.

क्रीडा स्पर्धेच्या खर्चाबाबत विचारलेल्या प्रश्नावर आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, या स्पर्धेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी याआधी जिथे कोट्यवधी खर्च केले, तीच कामे नव्याने घेऊन घोटाळा करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे.

अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विजय सरदेसाई, कार्लुस फेरेरा आक्रमक

एकाच कामावर वारंवार केला खर्च : सरदेसाई

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने कांपाल येथील जलतरण तलावावर १२ कोटी १७ लाख रुपये खर्च केले. आता पुन्हा तेच काम हाती घेऊन ३५ लाख ५२ हजार खर्च केला जात आहे. केवळ रंगरंगोटीवरच यापूर्वी १४ लाख खर्च केले.

आता त्याच कामावर १० कोटी करण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेचा पैसा वाया घालवला जात आहे, असा आरोप आमदार सरदेसाई यांनी केला.

सरदेसाईंकडून दिशाभूल : मंत्री गोविंद गावडे

विरोधकांच्या आरोपांवर पलटवार करताना मंत्री गावडे म्हणाले की, सरदेसाई हे सभागृहाची आणि जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यांचा हा स्वभावच असून पूर्वीपासून ते हेच करत आले आहेत.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी 225 कोटींची तरतूद केली आहे. केवळ नूतनीकरण कामे, प्रकल्प व्यवस्थापन यांसाठीच सल्लागारांची नेमणूक केली आहे. पण त्यांना पैसे दिलेले नाहीत, असे मंत्री गावडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shirgaon Stampede: 'शिरगाव' दोषींवर कारवाई होणार? गृह खात्याकडून फाईल सरकारकडे, काय आहे चौकशी समितीचे म्हणणे?

Horoscope: भाग्याची साथ! मेष-मिथुन राशींसह 'या' 5 राशींचा दिवस मंगलकारी; करिअर, नोकरी व व्यवसायात मिळेल सकारात्मक फळ

Goa Government Scheme: 'स्‍वस्‍थ नारी, सशक्‍त परिवार' योजने अंतर्गत तपासणी करून घ्‍या, CM सावंतांचे महिलांना आवाहन

India vs Pakistan: भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने, सुपर-4 मधील 'हाय होल्टेज' सामना 'या' दिवशी रंगणार; जाणून घ्या वेळापत्रक

Rohan Desai: रोहन देसाई यांचे भवितव्य शुक्रवारी ठरणार, बीसीसीआय निवडणूक अधिकाऱ्यांच्या छाननी प्रक्रियेकडे लक्ष

SCROLL FOR NEXT