Goa Assembly  Dainik Gomantak
गोवा

Goa Budget Session: अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर पर्वरी, पणजी येथे जमावबंदी लागू

आंदोलन, मोर्चा, सभा घेता येणार नाहीत; अधिवेशनकाळात अंमलबजावणी

Akshay Nirmale

Goa Budget Session: गोव्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी, 27 मार्चपासून सुरवात होत आहे. 27, 28, 29 आणि 31 तारखेपर्यंत हे अधिवेशन असणार आहे. त्या पार्श्वभुमीवर उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी पर्वरी आणि पणजी परिसरात जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. संपुर्ण अधिवेशनकाळासाठी हा आदेश लागू असणार आहे.

अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर काही आंदोलकांनी पणजी आणि पर्वरीत विविध विषयांबाबत आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे. पण त्यातून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होऊ शकतो. शांततेचा भंग होऊ शकतो.

त्यामुळे या काळात कुणाही व्यक्ती किंवा संस्थेला रस्त्यावर आंदोलन करता येणार नाही. चार पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव असणार आहे.

विधानसभेच्या 500 मीटर अंतरात कुणालाही आंदोलन, मोर्चा, धरणे, सभा, मिरवणूक यावर बंदी असेल. त्यासाठी कलम 144 लागू करण्यात येत आहे, असे पोलिस अधीक्षकांनी याबाबतच्या नोटिशीत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

'पोर्तुगीज येण्यापूर्वीपासून गोमंतकीय वारी करतायेत', CM सावंतांचं वक्तव्य; भक्तांसाठी उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन'

SCROLL FOR NEXT