Goa Assembly session  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात पावसाळी अधिवेशनाचे अखेर सूप वाजले

चर्चेसाठी सरकारने अपुरा वेळ दिल्याचा विरोधकांचा आरोप

दैनिक गोमन्तक

पणजी : केंद्राने घालून दिलेल्या नियमानुसारच राज्य सरकारने विविध विकास कामांसाठी कर्ज घेतल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत दिली. तर दुसरीकडे, सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा पूर्णतः फसवा आणि राज्याला दिवाळखोरीकडे नेणारा आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज सूप वाजले.

40 विधेयके आणि 55 तारांकीत प्रश्नांवर सविस्तर चर्चा या अधिवेशनात झाली असली तरी सरकारने पुरेसा वेळ दिला नसल्याची टिका विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. या अधिवेशनाबाबत सभापती रमेश तवडकर म्हणाले, पंचायत निवडणुकांमुळे अधिवेशनाचा कार्यकाळ कमी करावा लागला असला तरी सभागृहासमोरील सर्व कामकाज संपवले आहे.

सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांना चर्चेसाठी मुबलक वेळ दिला आहे. त्यामुळेच 40 विधेयके आणि 55 तारांकीत प्रश्नांबरोबर सर्वच अनुदान मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. याशिवाय शून्य प्रहर आणि लक्ष्यवेधीच्या माध्यमातून सभागृह सदस्यांनी अनेक प्रश्न तडीस नेले आहेत. दरम्यान, या अधिवेशनावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर विरोधकांनी मात्र महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा झाली नसल्याचे सांगत टीका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG Match Cancelled: एकही चेंडू न खेळता टीम इंडियाची एशियन गेम्सच्या सेमिफायनलमध्ये एन्ट्री! मुसळधार पावसामुळे भारत-अफगाणिस्तान सामना रद्द

Manoj Parab: मनोज परब पुन्हा राजकीय आखाड्यात? 2 ऑक्टोबरला भूमिका करणार स्पष्ट; दुसरा गट स्थापन करण्याची तयारी

South Goa Crime Cases: दक्षिणेत 8 महिन्यांत 525 गुन्ह्यांचा छडा, खुनाच्या सर्व सहा प्रकरणांची उकल

Surya Gochar 2026: हस्त नक्षत्रात सूर्याचे आगमन! 5 भाग्यवान राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; उत्पन्नात होणार घसघशीत वाढ

SIR Controversy: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिशाभूल, प्रसिद्धीपत्रकातील अनेक मुद्द्यांवर मौन; 'सिटीझन्स मॉनिटर-गोवा'तर्फे आरोप

SCROLL FOR NEXT