पंचायत व पालिका कायद्यात दुरुस्ती करण्याची विधेयके सादर करू असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी आज विधानसभेत दिले. Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: पालिका व पंचायत आरक्षण निवडणूक आयोगाकडे

आरक्षण व प्रभाग रचना पालिका प्रशासन संचालनालय आणि पंचायत संचालनालय यांनी केल्यामुळे अनेक घोळ झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: पालिका आणि पंचायत निवडणुकीसाठी (Municipal and Panchayat elections) आरक्षण तसेच प्रभाग रचनेचे काम राज्य निवडणूक आयोगाकडे सोपविण्यात येईल. त्यासाठी पंचायत व पालिका कायद्यात दुरुस्ती करण्याची विधेयके सादर करू असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी आज विधानसभेत दिले.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी या विषयीचा प्रश्न विचारला होता. ते म्हणाले आरक्षण व प्रभाग रचना पालिका प्रशासन संचालनालय आणि पंचायत संचालनालय यांनी केल्यामुळे अनेक घोळ झाले आहेत. जेणेकरून मागील पालिका निवडणुकीत चुकीच्या पद्धतीने आरक्षण केल्यामुळे जनतेला उच्च व सर्वोच्च न्यायालयात जावे लागले.

आमदार विजय सरदेसाई यांनी नमूद केले की केवळ सरकारने प्रतिष्ठेचा प्रश्न बनवल्यामुळे जनतेला सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावे लागले. राज्य निवडणूक आयोग प्रयत्न आहे असे सरकारने आता मान्य केले यातच आमची जीत आहे.

या चर्चेवेळी सरदेसाई यांनी शेरेबाजी केल्यामुळे तो भाग कामकाजातून वगळावा किंवा त्यांना विधान मागे घेण्यास सांगावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानंतर सभापतींनी आक्षेपार्ह शब्द कामकाजातून वगळण्याचे आदेश दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT