Goa Assembly Session electricity tariff hike tourists Unemployment Opposition leader Yuri Alemao government Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: वीजदर, म्हादईसह विविध मुद्द्यांवर सरकारला घेरणार; विरोधी पक्षाकडून जाब विचारणार- युरी आलेमाव

Opposition Leader Yuri Alemao: स्थानिक विषयांवर राज्य सरकारला येत्या विधानसभेच्या अधिवेशनात विरोधी पक्षाकडून जाब विचारला जाईल, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Session: राज्यातील वाढीव वीज दरवाढीसह घटलेली पर्यटक संख्या, म्हादईचा विषय, खाण सुरू करण्यात सरकारला आलेले अपयश, बेरोजगारी अशा विविध विषयांसह स्थानिक विषयांवर राज्य सरकारला येत्या विधानसभेच्या अधिवेशनात विरोधी पक्षाकडून जाब विचारला जाईल, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

विधानसभेच्या कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत अधिवेशनाविषयी काँग्रेस आमदार तथा ‘इंडिया’च्या विरोधी आमदारांची भूमिका काय असेल, त्याविषयी आलेमाव यांनी सांगितले, की वीज दरवाढीबरोबर भूमिगत वाहिनींमुळे होत असलेला लोकांना त्रास, त्याचबरोबर थकबाकी वसूल करण्यात आलेले अपयश.

त्याचबरोबर यापूर्वी राज्यात पवनऊर्जा निर्माण करणे खर्चिक असल्याचा अहवाल आला असतानाही पुन्हा पवनऊर्जा निर्मितीचे केंद्रीय राज्य मंत्र्यांनी दिलेले संकेत, हे सर्व सल्लागाराच्या फायद्यासाठी चालले आहे काय, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे उठसूठ सल्लागार नेमण्याचे भाजपचे कारस्थान असल्याची टीका त्यांनी केली.

म्हादईचा विषय अजूनही निकाली निघालेला नाही. सभागृह समिती अध्यक्षांचा तीन महिन्यांचा काळ संपलेला आहे, त्यावर सरकारने काही निर्णय घेतलेला नाही. राज्यात अपघातप्रवण स्थळे निश्‍चित झालेली आहेत, तरी त्यावर उपाययोजना झालेल्या नाहीत. स्मार्ट सिटीच्या कामांविषयी आम्ही ऑडिट करण्याची आणि श्‍वेत पत्रिका काढण्याची यापूर्वीच मागणी केली आहे. स्मार्ट सिटीचा सुरुवातीचा सल्लागार हॉटेलमध्ये बसून सल्ले देत होता, याकडेही आलेमाव यांनी लक्ष वेधले.

प्रत्येक अधिवेशनात मुख्यमंत्री खाणी सुरू करणार असल्याची घोषणा करतात, पण खाणी काही सुरू झालेल्या नाहीत. आरोग्य खात्याचे अनेक प्रश्‍न आहेत. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचे प्रश्‍न आहेत,असे युरी म्हणाले. आमदार एल्टन डिकॉस्ता आणि कार्लोस फेरेरा यांनीही आपले मत मांडले.

कमी झालेले पर्यटक चिंतेची बाब!

रुग्णालयांचे खासगीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न चालू असल्याने त्याविषयी आम्ही आवाज उठणार असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील पर्यटन खाते संक्रमणावस्थेतून जात आहे. पर्यटक कमी झालेले आहेत, पर्यटन हा राज्याचा आर्थिक कणा असल्याने कमी झालेले पर्यटक ही चिंतेची बाब आहे. राज्याचे पर्यटन धोरण कुठे आहे, असा सवाल करीत धबधब्यावर पर्यटकांना बंदी घालणे, यातून सरकारमध्ये समन्वय नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते, असेही युरी आलेमाव यांनी नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: पोलिसांच्या सापळ्यात अडकला ड्रग्ज विक्रेता! साडेसहा लाखांचे चरस हस्तगत; झारखंडच्या तरुणास अटक

Rashi Bhavishya 27 October 2024: विवाहाचा विषय मार्गी लागेल,धनलाभ देखील होईल; आजचा दिवस अत्यंत महत्वाचा

Content Creators Fair Goa: लाखो कमवण्याचा फंडा; एम. एस. धोनीने कंटेंट क्रिएटर्संना दिला लाखमोलाचा कानमंत्र

Goa Crime: फुलांच्या विक्रीवरुन हाणामारी, सुरी हल्ल्यात दोघेही जखमी; कोलवाळ-चिखली जंक्शनवरील घटना

Goa Crime: झुआरी पूलावरुन उडी मारुन 22 वर्षीय पोलिस शिपायाने संपवले जीवन; मृतदेहाचा शोध सुरु

SCROLL FOR NEXT