Goa Assembly Monsoon Session 2024: लोकसभा निकालानंतर पहिले अधिवेशन, कोणते मुद्दे गाजणार?

Goa Assembly Monsoon Session 2024: येत्या विधानसभा अधिवेशनात सर्व विरोधक एकत्र लढतील, असे विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
Goa Assembly Monsoon Session 2024
Goa Assembly Monsoon Session 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly Monsoon Session 2024

भाजप-मगोप युतीविरोधात काँग्रेसच्या झेंड्याखाली आप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), गोवा फॉरवर्ड, तृणमूल काँग्रेस हे सारे पक्ष एकवटले असताना आता राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १५ जुलैपासून सुरू होणार आहे. लोकसभेच्या निकालानंतर होणाऱ्या पहिल्याच अधिवेशनात कोण कोणते मुद्दे गाजतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

या अधिवेशनात एकवटलेले विरोधक सरकारला कसे धारेवर धरतात, याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

भाजपने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाची जागा जिंकणे प्रतिष्ठेचे करूनही एकवटलेल्या विरोधकांनी दक्षिण गोव्यात विजय मिळविल्याने काहीसे आक्रमक झालेले विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडण्याची शक्यता आहे.

Goa Assembly Monsoon Session 2024
Mapusa News : जलतरणपटू जेरी डिमेलोचा म्हापसा पोलिसांतर्फे सत्कार; चार सुवर्ण, दोन रौप्य, तीन कांस्य पदके

येत्या 15 जुलैपासून 21 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात विविध मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. यात कला अकादमीमधील गळती, एसटी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा, राज्यातील अपघात, गुन्हे, स्मार्ट सिटीची रखडलेली कामे, लाईनमनचा मृत्यू, खासगी कंपनीत गोमन्तकीयांना आरक्षणाचा मुद्दा, गोव्यातील कंपनीसाठी राज्याबाहेर मुलाखती घेणे यासारखे मुद्दे प्रामुख्याने गाजण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com