Goa assembly session 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: विधानसभेत गदारोळ! TCP खात्याच्या प्रश्नांवरून विरोधकांनी राणेंना घेरलं; सभापतींसमोरील हौदात धाव

Goa Assembly Chaos: नगरनियोजन खात्याशी संबंधित प्रश्नांवरून विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झाले

Akshata Chhatre

पणजी: गोव्याच्या विधानसभा अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी कामकाज सुरु झाल्याझाल्या गदारोळ पाहायला मिळाला. नगरनियोजन खात्याशी संबंधित प्रश्नांवरून विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह विरेश बोरकर, आल्टोन डिकॉस्टा, वेंझी विगास आणि क्रूझ सिल्वा या आमदारांनी थेट सभापतींसमोरील हौदात धाव घेतली आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची जोरदार मागणी केली.

विषय न्यायप्रविष्ट असल्याने उत्तरे टाळल्याचा आरोप

विरोधी आमदारांनी आरोप केला की, टीसीपी खात्याबाबत विचारलेले प्रश्न जाणीवपूर्वक पुढे ढकलण्यात आले आहे, मात्र यावर उत्तर देताना मंत्री विश्वजीत राणे यांनी काही विषय हे न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले. विरोधकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करूनही ते माघार घ्यायला तयार नव्हते. यामुळे सभापती रमेश तवडकर यांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी थांबवले आहे.

आमदार विजय सरदेसाई जागेवरच

या आक्रमक पवित्र्यात अन्य काही विरोधी आमदार सहभागी झाले असले, तरी आमदार विजय सरदेसाई हे मात्र आपल्या जागेवरच बसून होते, असेही यावेळी दिसून आले. विरोधकांच्या या भूमिकेमुळे सभागृहात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेने विधानसभेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाढता संघर्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

सभापतींच्या आश्वासनानंतर कामकाज पूर्वपदावर

अखेरीस, प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर चर्चा करण्याची हमी सभापती रमेश तवडकर यांनी दिल्यानंतर विरोधक माघारी फिरले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज पूर्वपदावर आले. या घटनेने विधानसभेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाढता संघर्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: पर्वतावरील पाषाणी दगडांची तोडफोड, संयुक्त समितीकडून पाहणी; सौंदर्यीकरण करताना नुकसान

Goa Crime: 'ड्रग्ज'प्रकरणी नायजेरियन व्यक्तीला अटक, 64 ग्रॅम गांजासह स्कूटर जप्त; पेडणे पोलिसांची कारवाई

Tiger Reserve Goa: समिती करणार व्याघ्र प्रकल्प क्षेत्र पाहणी, गुरूवारी सचिवालयात होणार संबंधित घटकांशी चर्चा

Ravi Naik Political Career: नगरसेवक ते मुख्यमंत्री...गोव्याच्या राजकारणातील 'दीपस्तंभ' रवी नाईक, वाचा त्यांची राजकीय कारकीर्द

बहुजनांचा कैवारी हरपला! रवी नाईक यांच्‍यावर शासकीय इतमामात अंत्‍यसंस्‍कार, अखेरच्‍या दर्शनास जनसागर

SCROLL FOR NEXT