Goa Assembly Session 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: हिवाळी अधिवेशनाचा हायव्होल्टेज प्रारंभ! 'हडफडे' अग्नितांडवावरून विरोधक आक्रमक; राज्यपालांच्या भाषणदरम्यान 'शेम-शेम'च्या घोषणा

Goa Assembly Winter Session 2025: गोव्याच्या ८ व्या विधानसभेच्या बहुप्रतीक्षित हिवाळी अधिवेशनाला आज, सोमवार १२ जानेवारी २०२६ पासून अत्यंत तणावपूर्ण वातावरणात सुरुवात झाली.

Sameer Amunekar

Goa Assembly Debates : गोव्याच्या ८ व्या विधानसभेच्या बहुप्रतीक्षित हिवाळी अधिवेशनाला आज, सोमवार १२ जानेवारी २०२६ पासून अत्यंत तणावपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विशेषतः हडफडे येथील अग्नितांडवातील मृतांना न्याय देण्याच्या मागणीवरून विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतले, ज्यामुळे कामकाजात वारंवार अडथळे आले.

हडफडे प्रकरणावरून विरोधकांचा संताप

अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांच्या अभिभाषणाने होणार होती. मात्र, राज्यपाल बोलण्यासाठी उभे राहताच विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी गदारोळ सुरू केला.

हडफडे येथील आगीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा विशेष उल्लेख अभिभाषणात करावा आणि या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. "पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे," अशा घोषणांनी विधानसभा परिसर दणाणून गेला होता.

'शेम... शेम'च्या घोषणा आणि फलकबाजी

राज्यपालांनी आपले भाषण सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला असता, विरोधी बाकांवरील सदस्यांनी हातात फलक घेऊन सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. "शेम... शेम" अशा घोषणा देत विरोधकांनी सरकारवर निष्क्रीयतेचा आरोप केला. हडफडे आगीच्या घटनेत प्रशासकीय हलगर्जीपणा झाल्याचा दावा करत विरोधकांनी राज्यपालांच्या भाषणात व्यत्यय आणला. यामुळे सभागृहातील वातावरण कमालीचे तापले होते.

सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी आणि राज्यपालांच्या अभिभाषणात येणारे अडथळे दूर करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी कठोर पावले उचलली. वारंवार सूचना देऊनही विरोधक शांत होत नसल्याने अखेर मार्शल्सना पाचारण करण्यात आले. गोंधळ घालणाऱ्या विरोधी सदस्यांना मार्शल्सनी सभागृहाबाहेर काढण्यात आलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'आज त्रास, उद्या विकास', पायाभूत सुविधांच्या कामांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल राज्यपालांकडून खेद व्यक्त; दीर्घकालीन फायद्याची दिली ग्वाही

Donald Trump: "मीच नाटोचा तारणहार!" डोनाल्ड ट्रम्प यांचा जागतिक राजकारणात नवा धमाका; ग्रीनलँडवर फडकणार अमेरिकेचा झेंडा?

IND VS NZ: विजयानंतरही 'BCCI'चा मोठा निर्णय; भारतीय ताफ्यात नवा भिडू सामील, वॉशिंग्टन सुंदर बाहेर

Goa Winter Session 2026: 'कुशावती' जिल्हा निर्मिती, खाणकाम अन् विकासाचा नवा रोडमॅप; राज्यपालांच्या भाषणातील 9 महत्त्वाचे मुद्दे

Goa Assembly Session: "मी कोणताही वैयक्तिक कायदा बनवलेला नाही" मंत्री विश्वजित राणे

SCROLL FOR NEXT