Mauvin Godinho Dainik Gomantak
गोवा

Mauvin Godinho: राज्य सरकार 15 वर्षांपेक्षा जुनी असलेली एकूण 520 वाहने करणार स्क्रॅप; 95.85 कोटी रूपये खर्च

वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांची विधानसभेत माहिती

Akshay Nirmale

Minister Mauvin Godinho in Goa Assembly 2023: राज्य सरकारने 10 मे 2023 रोजी 'नोंदणीकृत वाहन स्क्रॅपेज धोरण' अधिसूचित केले आहे. त्यानुसार 15 वर्षांपेक्षा जुनी असलेली वाहने सरकार भंगारात काढणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री माविन गुदिन्हो यांनी शुक्रवारी विधानसभा सभागृहात दिली.

विरोधी पक्षाच्या आमदारांनी विचारलेल्या प्रश्नाला गुदिन्हो उत्तर देत होते. दरम्यान, राज्यात 15 वर्षांपेक्षा जुन्या सरकारी वाहनांची संख्या 520 इतकी आहे. तर ही वाहने बदलण्यासाठी अंदाजे 95.85 कोटी खर्च येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गुदिन्हो म्हणाले की, या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी 'नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा' (RVSF) स्थापन करण्यात येत आहे.

रस्त्यावरील जुनी आणि प्रदूषण करणारी वाहने कमी करण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) स्क्रॅपिंग धोरण लागू केले आहे. प्रदुषण नियंत्रणासाठी जुन्या वाहनांची संख्या कमी करणे हाच या धोरणाचा उद्देश आहे.

वातावरणातील कार्बन वाढीसाठी वाहतूक क्षेत्र मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. हवामान बदलाच्या दृष्टीने हे धोरण लाभदायी ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Lalbagh Mango: कर्नाटकातील 'लालबाग' आंबा डिचोलीच्या बाजारपेठेत दाखल, किलोचा दर 200 रुपये

ZP Election 2025: सावर्डेत मोहन, आतिष यांच्यात थेट लढत; आरजी, काँग्रेस रिंगणात, आमदार गणेश गावकर यांची प्रतिष्ठा पणाला

Richard Mille luxury watch: अंबानींची 'रॉयल' भेट! लिओनेल मेस्सीला दिलं 11 कोटींचं घड्याळ, 'रिचर्ड मिल' ब्रँडचं वैशिष्ट्यं काय?

सायबर गुन्ह्यांविरुद्ध 'मूग गिळून गप्प' बसू नका: तक्रार करा, साखळी तोडा!

थायलंड समजून गोव्यात येऊ नका! नाईटक्लब बंद करण्याची भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांची मागणी

SCROLL FOR NEXT