पणजी: सातव्या विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्च 2022 ला संपत असला तरी या विधानसभेत पक्षांतराच्या कारणास्तव सर्वाधिक आमदारांनी राजीनामे दिले आहेत. याशिवाय 3 राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षाची विलीनीकरण झाल्याची माहिती विधानसभेच्या सचिव नम्रता उलमन यांनी दिली आहे. नम्रता या विधानसभेच्या पहिल्या महिला सचिव आहेत. त्यांच्याच कार्यकाळात सर्वाधिक 14 आमदारांनी (MLA) राजीनामे दिले. (Goa Election 2022 Latest News Update)
निवडणूक आयोगाने (Election Commission) राज्यात निवडणुका जाहीर करत आचारसंहिता लागू केली आहे. आता पक्षांतरबंदी कायदा अधिक कडक झाल्याने एका राजकीय पक्षातून दुसऱ्या पक्षात पक्षांतर करण्यासाठी आमदारांना राजीनामा देणे गरजेचे आहे. त्यानुसारच आतापर्यंत 14 आमदारांनी राजीनामे दिले. हे राजीनामे स्वीकारण्याचे काम सभापतींना करावे लागते.
मात्र, त्यांच्या गैरहजेरीत हे काम सचिव करतात. सध्या आचारसंहिता लागू झाल्यानंतर हे काम नम्रता उलमन यांना करावे लागत आहे. त्यामुळे सध्या रोजच्या वर्तमानपत्राबरोबर सोशल मीडियात (Social Media) आमदार राजीनामे देतानाचे त्यांचे फोटो सर्वत्र चर्चेत आहेत.
विधानसभेच्या पहिल्या महिला सचिव
नम्रता यांच्याबाबत अनेक योगायोग आहेत. वडील ए.बी.उलमन हे विधानसभा सचिव होते. शिवाय तेही संशोधक सहाय्यक म्हणून विधानसभेत रुजू झाले होते. नम्रता विधानसभेच्या पहिल्या महिला सचिव आहेत. त्यांच्या कार्यकाळात सर्वात जास्त कार्यकाळाची 21 दिवसांची विधानसभा झाली. याशिवाय सर्वाधिक वेळ पहाटे 4:30 पर्यंत विधानसभेचे कामकाज ही यांच्याच कार्यकाळात झाले.
आमदारांशिवाय मोजक्या लोकांना परवानगीने सभागृहात जाता येते. येथे काम करण्याचा अभिमान असला तरी मोठी जबाबदारी आहे. सध्या सभापतींच्या गैरहजेरीत मला त्यांचे काम करावे लागत आहे. हे खरे आहे की या सातव्या विधानसभेत सर्वाधिक आमदारांनी पक्षांतरासाठी राजीनामे दिले.
- नम्रता उलमन, विधानसभा सचिव
27 मार्च 2019 रोजी मगोप दीपक पावसकर आणि बाबू आजगावकर यांनी वेगळा गट करून भाजपमध्ये विलीन केला.
10 जुलै 2019 रोजी काँग्रेसच्या दहा आमदारांनी वेगळा गट करून भाजपमध्ये विलीन केला.
13 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रवादीच्या चर्चिल आलेमाव यांनी आपला गट तृणमूल काँग्रेसमध्ये विलीन केला.
या आमदारांनी दिले राजीनामे
विश्वजीत राणे : 16 मार्च 2017
सुभाष शिरोडकर : 16 ऑक्टोबर 2018
दयानंद सोपटे : 16 ऑक्टोबर 2018
लुईझींन फालेरो : 27 सप्टेंबर 2021
जयेश साळगावकर : 2 डिसेंबर 2021
रवी नाईक : 17 डिसेंबर 2021
रोहन खंवटे : 15 डिसेंबर 2021
एलिना साल्ढाणा : 16 डिसेंबर 2021
आलेक्स रेजिनाल्ड : 20 डिसेंबर 2021
कार्लुस आल्मेदा : 21 डिसेंबर 2021
प्रसाद गावकर : 9 जानेवारी 2022
मायकल लोबो : 10 जानेवारी 2022
प्रवीण झांट्ये : 10 जानेवारी 2022
गोविंद गावडे : 10 जानेवारी 2022
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.