Minister Mavin Gudinho  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session: माविन यांच्याकडून पुन्हा गोवा माईल्स समर्थन, टॅक्सी चालकांनी अ‍ॅपवर येण्याबाबत भाष्य

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: क्रीडा खात्यासंबधित प्रश्नोत्तराचा तास, मंत्री गोविंद गावडे निशाण्यावर.

Pramod Yadav

माविन यांच्याकडून पुन्हा गोवा माईल्स समर्थन, टॅक्सी चालकांनी अ‍ॅपवर येण्याबाबत भाष्य

वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी पुन्हा गोवा माईल्सचे समर्थन केले. तसेच, ते स्थानिक टॅक्सी चालकांच्या विरोधात नसून त्यांना एक शिस्त लागण्याची गरज आहे, असे मत गुदिन्हो यांनी मांडले. सरकार टॅक्सी चालकांसाठी अनेक गोष्टीकरत आहे. पण, टॅक्सी चालक मोपा लिंक रोडवरील टोलला विरोध करत आहेत सगळेच फुकट देऊन कसे चालेल? असा सवाल माविन यांनी उपस्थित केला.

'पंचायत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा'

पंचायतींचा निधी कमी झाला आहे. 41 पंचायत प्रकल्प प्रलंबित आहेत. तर पाच पंचायतींना सभागृह नाहीये. याशिवाय, 42 गावांमध्ये स्मशामभूमी नाहीये, असे आमदार विजय सरदेसाई सभागृहात म्हणाले.

सरदेसाई पुढे म्हणाले की, सात पंचायतींना पूर्णवेळ सचिव नाहीये. तर काही पंचायतींमध्ये अनेक दशकांपासून सचिवांची बदली झालेली नाही. पंचायत कर्मचाऱ्यांना देखील सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा.

जनतेचे हित लक्षात घेऊन गोवा माइल्सचा प्रश्न मिटवला पाहिजे

जनतेचे हित लक्षात घेऊन गोवा माइल्सचा प्रश्न शांततेने मिटवला पाहिजे. तर मोटारसायकल पायलट यांना आपण ट्रान्सफोर्टचे ब्रँड ॲम्बेसेडर बनवले पाहिजे. त्यांना पाठिंबा देऊन त्यांचा व्यवसाय टिकवण्यासाठी मदत केली पाहिजे, असे आमदार वेन्झी व्हिएगस विधानसभेत म्हणाले.

व्हिएगस पुढे म्हणाले की, माझ्या मतदारसंघात सात पंचायती असून त्यांना निधीची आवश्यकता आहे, ज्याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक पंचायत सचिव छोट्या छोट्या कामांसाठी पैशांची मागणी करतात.

स्थानिकांना रोजगार संधीसाठी ८० टक्के आरक्षणाची संकल्प आमोणकर यांची देखील मागणी

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी देखील स्थानिकांना ८० आरक्षण देण्याची मागणी आमदार संकल्प आमोणकर यांनी केली आहे.

वास्को बसस्थानकाची अवस्था दयनीय - कृष्णा दाजी साळकर

वास्को बसस्थानकाची अवस्था दयनीय आहे. माझा मंत्र्यांवर विश्वास आहे, आमच्याच मतदारसंघातील असल्याने ते हा विषय मार्गी लावतील, असे कृष्णा दाजी साळकर म्हणाले.

तसेच, वास्कोत बस कमी असल्याचे देखील साळकर म्हणाले. टॅक्सी व्यावसायिकांची समस्या देखील तात्काळ सोडवावी असे, साळकर म्हणाले.

स्थानिकांना ८० टक्के रोजगार देण्यासाठी धोरण तयार करा - क्रुझ सिल्वा

राज्यातील रोजगार संधी कमी होतायेत, कंपन्या देखील परप्रातीयांना घेतायेत. सरकारने स्थानिकांना ८० टक्के रोजगार देण्यासाठी धोरण तयार करावे, अशी मागणी क्रुझ सिल्वा यांनी केली.

पेडण्यातील पंचायतीना निधी न दिल्याचा आमदार आर्लेकरांचा आरोप, निधी देण्याची मागणी

पेडण्यातील पंचायतीना निधी न दिल्याचा आमदार आर्लेकरांनी केला. येत्या काळात पंचायतींना निधी देण्याची मागणी त्यांनी केली.

रोजगार मेळाव्यामधून एवढ्या रोजगाराचा सरकारचा दावा!

सरकारने आयोजीत केलेल्या रोजगार मेळाव्यातमधून (Job Fair) २ हजार नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. मंत्री बाबुश मोन्सेरात यांची सभागृहात मागणी‌.

आयपीबीकडून फक्त २ हजार ५०५ नोकऱ्या

आयपीबी (Investment Pramotion Board) यांनी २३ हजार रोजगार निर्मितीचा दावा केला होता मात्र प्रत्यक्षात त्यांनी फक्त २ हजार ५०५ रोजगार तयार केला आहे. आपचे आमदार व्हेंजी व्हिएगसांचे विधानसभेत प्रतिपादन.

महाराष्ट्रात मुलाखती! 'त्या' दोन कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस आणि गुन्हा दाखल!

गोव्यातील प्लांटसाठी गोव्याबाहेर मुलाखती आयोजीत केलेल्या इंडीको फार्मा आणि एन्क्युब ह्या दोन फार्मा कंपन्यांना सरकारकडून कारणे दाखवा नोटीस आणि त्यांच्या विरोधात कोर्टात केस दाखल. मंत्री बाबुश मोन्सेरातांची माहिती.

गोव्यातील बेरोजगारीचा मुद्दा, स्थानिकांना नोकरी; वेंझींच्या लक्षवेधीवर चर्चा

ICAR करणार गोव्यातील खाजन शेतीचा अभ्यास; मुख्यमंत्री

कृषी भवनच्या भारतीय कृषी संशोधन परिषद गोव्यातील खाजन शेतीचे भात आणि मासळी उत्पादनाच्या क्षमतेचा अभ्यास करणार. याचा अभ्यास अहवाल येत्या दोन महिन्यात येण्याची शक्यता आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सभागृहात उत्तर देताना म्हणाले.

मुरगावचे आमदार आमोणकरांनी खाजन शेतीबाबत मराठीतून मांडली लक्षवेधी

भात शेतीच्या बांधाना भगदाडे पडून व शेतात खारे पाणी घुसून व शेतात कोळंबीची पैदास केल्याने शेतांची कायमची नासधुस होते, अशी भीती जनतेच्या मनात आहे. अशा शेतामध्ये भाताची लागवड आणि मासळीची पैदास या दोन्ही गोष्टी व्हावी, आणि खाजन क्षेत्र राखावे व पुढील पिढीसाठी राखावे यासाठी संकल्प आमोणकरांनी लक्षवेधी मांडली.

आयोगामार्फत होणार कर्मचारी भरती - मंत्री गावडे

ग्रामविकास खात्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने अनेक मतदारसंघातील कामे खोळंबली असल्याचा आरोप आमदारांनी केला. यावर उत्तर देताना आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती आयोगामार्फत होणार अशी माहिती क्रीडा मंत्री गावडे यांनी दिली.

गणेश चतुर्थीपूर्वी विजेत्या गोमंतकीय खेळाडुंना बक्षीसांचे वितरण

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि पॅरालंपिक स्पर्धेत पदके मिळवलेल्या गोमंतकीय खेळाडुंना येत्या गणेश चतुर्थीपूर्वी जाहीर केलेल्या बक्षीसांचे वितरण केले जाईल, अशी ग्वाही क्रीडामंत्री गावडे यांनी दिली.

पोलिसांचा हलगर्जीपणा, दै.गोमन्तकचे वृत्त विधानसभेत

दक्षिण गोव्यात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याचे दै.गोमन्तकचे वृत्त विधानसभेत. दक्षिण गोव्याचे पोलिस पत्रकारांचेही फोन घेईनात.आमदार व्हेंझी व्हिएगसांनी उपस्थित केला मुद्दा.

Goa Assembly Monsoon session Today Live Watch Here

पॅरालंपिक संघटनेला मान्यता देण्याचा प्रयत्न सुरु - गोविंद गावडे

पॅरालंपिक संघटनेला मान्यता देण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली. मान्यता मिळाल्यानंतर संघटनेला निधी दिला जाईल, असे गावडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT