Goa Monsoon Session 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2023: सत्ताधारी -विरोधकांना चर्चेसाठी समान वेळ!

सभापती : विधानसभा कामकाजासंदर्भात सल्लागार समितीचा निर्णय; 18 जुलैपासून अधिवेशन

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly पावसाळी अधिवेशनासाठी आज, मंगळवारी कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधकांनाही चर्चेसाठी समान वेळेची केलेली मागणी मान्य करण्यात आल्याने या अधिवेशनात विरोधकांना चर्चेत जास्त काळ भाग घेता येणार आहे.

18 जुलै ते 10 ऑगस्टपर्यंत 18 दिवस हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनासाठी मंगळवारी कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली.

या बैठकीला सभापती रमेश तवडकर, उपसभापती जोशुआ डिसोझा, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार विजय सरदेसाई, वेंझी व्हिएगस, वीरेश बोरकर आणि विधानसभा सचिव नम्रता उल्मन उपस्थित होत्या.

आजच्या बैठकीत विरोधकांनी आश्वासन समिती सक्रिय करणे, विरोधकांना चर्चेसाठी वाढीव वेळ द्यावी आणि चार लक्षवेधी सूचना मांडता याव्यात, अशी मागण्या केली होती. या मागण्या सत्ताधारी गटाने मान्य केल्याने आज विरोधक खूश होते. या अधिवेशनात खासगी कामकाजाचे तीन दिवस आहेत.

नेमकेच प्रश्‍न विचारा!

विधानसभेत अनेक नवीन आमदार पाचपेक्षा जास्त प्रश्न विचारतात. त्यामुळे विधानसभेचा वेळ वाया जातो. यासाठी आमदारांनी नेमकेच प्रश्न विचारावेत, असे सांगण्यात आले आहे.

विधानसभा दीर्घकाळ चालणारी असल्याने संध्याकाळी 7 पर्यंत कामकाज संपेल, हे पाहिले जाईल. यात 3 तास विविध मुद्द्यांवर चर्चा होईल, याकडे लक्ष दिले जाईल, अशी ग्वाही सभापती तवडकर यांनी दिली.

कामकाज सल्लागार समितीच्या मंगळवारच्या बैठकीत विरोधकांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे या दीर्घकाळ चालणाऱ्या अधिवेशनात विरोधकांनी केवळ विरोधाला विरोध न करता राज्याच्या हितासाठी सकारात्मकपणे विरोधकाची भूमिका बजावावी. - रमेश तवडकर, सभापती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT