Goa Assembly Monsoon Session 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: पिटबुल-रॉटविलरवरील बंदीचे विधेयक विधानसभेत सादर; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Assembly Monsoon Session News: जाणून घ्या गोव्यातील पावसाळी अधिवेशन, राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी.

गोमंतक ऑनलाईन टीम

पिटबुल-रॉटविलरवरील बंदीचे विधेयक विधानसभेत सादर; वाचा दिवसभरातील घडामोडी

गोव्यात वाढत्या हिंसक कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 'पिटबुल' आणि 'रॉटविलर' यांसारख्या आक्रमक कुत्र्यांच्या जातींवर निर्बंध आणण्याची तरतूद असलेले 'गोवा प्राणी प्रजनन, नियमन व नुकसानभरपाई विधेयक 2025' (The Goa Animal Breeding and Domestication Regulation and Compensation Bill 2025) आज विधानसभेत सादर करण्यात आले. पशुसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी हे विधेयक सभागृहात मांडले.

अर्थसंकल्पात खोटी आणि फसवी आकडेवारी दिली, सरदेसाईंची सावंत सरकारवर घणाघाती टीका

गोवा विधानसभेच्या सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आणि सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार घमासान पाहायला मिळाले. यावेळी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर 'खोटी आणि फसवी आकडेवारी' सादर केल्याचा आरोप करत घणाघाती टीका केली. सरकारकडे पैसा असतानाही कर्ज का काढले जात आहे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित विचारला.

गोव्यात भटक्या कुत्र्या आणि गुरांचा पर्यटकांना धोका: मायकल लोबो यांनी सरकारला धारेवर धरले

गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर भटक्या कुत्र्यांचा आणि रस्त्यांवर मोकाट गुरांचा वाढलेला उपद्रव पर्यटकांसाठी मोठा धोका बनला आहे, असे मत व्यक्त करत आमदार मायकल लोबो यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मोकाट गुरांमुळे झालेल्या अपघातांमध्ये अनेकांनी जीव गमावले, मात्र सरकार गेल्या पाच वर्षांपासून केवळ आश्वासने देत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

"गोव्यातही एक मजबूत धर्मांतर विरोधी कायदा आवश्यक"

काही राज्यांनी जबरदस्तीने धर्मांतर टाळण्यासाठी धर्मांतर विरोधी कायदा आणला आहे. अशा घटना टाळण्यासाठी गोव्यातही एक मजबूत धर्मांतर विरोधी कायदा आवश्यक आहे असे मला वाटते. अशा लोकांना ओळखणे महत्वाचे आहे, पोलीस, विशेष शाखा त्यांच्या बाजूने काम करत आहेत परंतु विशेषतः ग्रामपंचायती आणि पंचांना त्यांच्या क्षेत्रात काय घडत आहे हे माहित असणे आवश्यक आहे. पोलिसांना माहिती आहे पण त्यांना देखील सहकार्य करणे आवश्यक आहे. अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना जास्त वेळ लागणार नाही आणि भविष्यात आम्ही अशा लोकांना गोव्यात येऊ देणार नाही: मुख्यमंत्री

आमदार डिलायला लोबो यांनी केली वैलंकनी येथे गोवा सदनाची विनंती

दरवर्षी गोव्यातील हजारो लोक वैलंकननी येथे येतात. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करू इच्छितो की त्यांनी तेथे गोवा सदन उभारण्याचा विचार करावा, ते आपल्या गोव्यातील लोकांसाठी खूप मदत करेल.

"योग्य व्यवस्था नसलेला राज्य महोत्सव धोकादायक" आमदार कार्लोस

  • लईराई जत्रा दरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि काही लोकांचा मृत्यू झाला. तयारीशिवाय राज्य महोत्सव घोषित करणे म्हणजे त्रास निर्माण करण्यासारखे आहे.

  • पर्यटक येतील आणि त्यामुळे लोकांमध्ये भांडणे होऊ शकतात आमदार अ‍ॅड. कार्लोस फेरेरा

धर्मांतर प्रकरणी पोलिस यंत्रणा अंधारात कशी? आमदार प्रमेंद्र शेट

उत्तर प्रदेश पोलिसांनी धर्मांतर प्रकरणी अटक केलेल्या आयेशा हिच्या बॅंक खात्यावर विदेशातून कोट्यवधी रुपये येऊनही पोलिस यंत्रणा अंधारात कशी, आमदार प्रमेंद्र शेट यांचा विधानसभेत सवाल.

मासिक देयक विलंबामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी वाढल्या

आठव्या गोवा विधानसभेच्या दहाव्या अधिवेशनात शून्य प्रहरात, आमदार संकल्प आमोणकर यांनी दयानंद सामाजिक सुरक्षा (डीएसएस) योजनेअंतर्गत मासिक देयक विलंबामुळे ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या वाढत्या अडचणींवर प्रकाश टाकला.

रोजंदारीवरील कामगारांच्या वेतनात मोठी वाढ!

सरकारी खात्यांतील रोजंदारीवरील कामगारांना टेंपररी दर्जा. सेवेत ७ वर्षे पूर्ण केलेल्यांना २०,००० ते २५,००० पर्यंत, तर २० वर्षे काम केलेल्यांना ४०,००० पेक्षा जास्त वेतन मिळणार. राज्यात असे सुमारे ३,००० कामगार. निवृत्तीनंतर त्यांना पेन्शनही मिळणार : डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

विधानसभेने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे केले अभिनंदन

गोवा विधानसभेने सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे ज्युनियर इंटरनॅशनल फॉर एशिया अँड पॅसिफिक रिजन - २०२५ च्या आठ सर्वात प्रभावशाली आणि प्रतिनिधी सदस्यांपैकी एक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

"दाबोळी विमानतळावर नवीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या नाही" आमदार मायकल लोबो

  • आमदार मायकल लोबो यांनी पूर्वीच्या आश्वासनांनंतरही दाबोळी विमानतळावर नवीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या नसल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला.

  • "दाबोळी आणि मोपा विमानतळ एकत्र काम करू शकतील याची खात्री करण्यासाठी व्यवहार्यता अभ्यास करण्यात आला होता का?" आमदारांनी असाही प्रश्न उपस्थित केला

'मोपा'तून आतापर्यंत मिळाला ६५ कोटींपेक्षा अधिक महसूल!

  • मोपा विमानतळाकडून आतापर्यंत ६५ कोटींपेक्षा अधिक महसूल प्राप्त. या विमानतळामुळे गोव्यात येणार्‍या विमानांची संख्या दुप्पट. दाबोळीवर येणार्‍या विमानांसाठीच्या सबसिडीत केंद्राकडून वाढ. दोन्ही विमानतळे पुढील काळातही राहणार कार्यान्वित : डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

  • दाबोळीवरील एअरलाईन्स कंपन्यांचे स्थलांतर मोपावर झाल्याने दाबोळीची अवस्था बिकट झाल्याचा अामदार मायकल लोबोंचा दावा.

शापोरा किल्ल्यावरील कामे १५ दिवसांत सुरू करू!

  • शापोरा किल्ल्यावरील प्रलंबित कामे १५ दिवसांत सुरू करणार. या किल्ल्यावरील बेकायदेशीर व्यवसाय बंद करून तेथे पर्यटकांसाठी तिकीट व्यवस्था सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे करणार : सुभाष फळदेसाई, मंत्री, पुरातत्त्व खाते

  • आमदार डिलायला लोबोंनी उपस्थित केला प्रश्न

गृहनिर्माण मंडळ पेडण्यात उभारणार सदनिका!

  • गृहनिर्माण मंडळाचे फ्लॅट घेण्यासाठी १५ वर्षांचा रहिवाशी दाखला नाही, तर गोव्यात ३० वर्ष‍ांच्या रहिवासाची अट आहे. गोमंतकीयांना कमी दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी पेडण्यात जागाही संपादित करण्यात येत आहे : डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

  • आमदार प्रेमेंद्र शेट, व्हेंझी व्हिएगस, विजय सरदेसाईंनी उपस्थित केला होता प्रश्न.

'गोमन्तक'च्या वृत्ताची सभागृहात दखल!

  • ग्रामीण भागांतील रस्ते १५ आणि २० मीटर रुंद करण्यास आमदार विजय सरदेसाईंचा विरोध. ४,१०० जण‍ांना नोटीसा दिल्याचा दावा.

  • या निर्णयामुळे ग्रामीण भागांतील अनेक घरे, मंदिरे उद्धवस्त होणार असल्याची व्यक्त केली भीती. यासंदर्भातील वृत्त आजच्या 'गोमन्तक'मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

मुख्यमंत्री- विरोधी पक्षनेते सुरुवातीलाच आमने-सामने!

  • गेल्या अधिवेशनातील प्रश्नांची उत्तरे न दिल्याचा दावा करीत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आक्रमक. ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप करीत युरींनी फेकली कागदपत्रे.

  • देशात आणिबाणी लागू झाली तेव्हाच लोकशाहीची हत्या झाल्याचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा टोला

मुख्यमंत्री- विरोधी पक्षनेते सुरुवातीलाच आमने-सामने! पिढीजात घरे, पोर्तुगीजकालीन मंदिरे धोक्यात

  • गोमंतकीयांच्या घरा संदर्भात स्थानिक वर्तमानपत्राने मांडलेल्या भुमिके संदर्भात विधानसभेत काढणार आवाज : आमदार विजय सरदेसाई

"अन्यथा रो-रो फेरी सेवा बंद केली जाईल" मंत्री सुभाष

काही लोक व्हिडिओ बनवण्यासाठी स्वच्छतागृहांची दुरवस्था करून रो-रो फेरीची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर स्थानिक पंचायत सदस्य किंवा निवडून आलेले प्रतिनिधी मला लेखी निवेदन देऊन सांगतात की ते रो-रो सेवेवर नाखूष आहेत आणि जुन्या फेरी व्यवस्थेकडे परत जाऊ इच्छितात, तर आम्ही रो-रो फेरी बंद करण्यास आणि जुन्या फेरी अधिक सोयीस्कर असल्यास परत आणण्यास तयार आहोत: मंत्री सुभाष फल देसाई.

म्हापसा येथे सर्वाधिक ७२ मिमी पाऊस

गेल्या २४ तासांत, म्हापसा येथे सर्वाधिक ७२ मिमी पाऊस पडला तर काणकोण येथे सर्वात कमी १५.२ मिमी पाऊस पडला.

केरये- खांडेपार येथे रविवारी रात्री धोकादायक जंक्शनवर कारची दुभाजकाला धडक

केरये- खांडेपार येथे रविवारी रात्री धोकादायक जंक्शनवर कारची दुभाजकाला धडक. कारचे नुकसान. चालक सुखरूप.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इंडिगोच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; गोवा-इंदूर फ्लाईटची हायड्रॉलिक सिस्टीम लँड होण्यापूर्वी बिघडली, 140 प्रवाशांनी रोखले श्वास

Jagdeep Dhankhar Resigns: जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा; दिलं 'हे' कारण

Mumbai Goa Highway: 'कोकणच्या माणसाची कोणाला पडलेलीच नाहीय...', महामार्गावर खड्डेच खड्डे; मनसे नेत्यानं शेअर केला Video

IND vs ENG 4th Test: इंग्लंडमध्ये जस्सी बनणार किंग! 'हॅटट्रिक'सह बुमराह रचणार नवा रेकॉर्ड; दिग्गजाला सोडणार मागे

VIDEO: बंद खोलीतून आवाज ऐकून दरवाजा उघडला, आत पाहताच नवरा थक्क!

SCROLL FOR NEXT