MLA Venzi Viegas Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session : राज्यात मत्स्य उत्पादनाचा उच्चांक; गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक नोंद

आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी विधानसभेत विचारलेल्या लेखी प्रश्‍नाला मच्छीरमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी लेखी उत्तर

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Monsoon Session : राज्यात गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत २०२२ - २३ या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात मत्स्य उत्पादनात वाढ झाली. सुमारे १.४० लाख टन मासळी पकडण्यात आली, तर सुमारे ६३ हजार मेट्रिक टन मासळी विदेशात निर्यात करण्यात आली. त्यातून सुमारे १ हजार कोटी मिळाले. गोव्याच्या क्षेत्रातील समुद्र बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या कर्नाटक व महाराष्ट्राच्या १४ बोटींच्या मालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी विधानसभेत विचारलेल्या लेखी प्रश्‍नाला मच्छीरमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी लेखी उत्तर दिले आहे.

२०१८-१९ साली १,२०,२८८ टन मासळी पकडण्यात आली होती, त्यापैकी १,१५,४५९ टन सागरी पाण्यातील, तर ४,८२९ टन अंतर्देशीय पाण्यातील आहेत. २०१९ - २० साली मत्स्य उत्पादनात १५ हजार टनाने घट झाली. १,०५,५४७ टन मासळी मिळाली.

त्यातील १,०१,४६६ टन सागरी, तर ४०८१ टन अंतर्देशीय पाण्यातील होती. २०२० - २१ साली हे प्रमाण काही प्रमाणात वाढून १.११,४८४ टन मासळी पकडण्यात आली. त्यामध्ये सागरी १.०६,१५९ टन, तर अंतर्देशीय ५३२५ टन आहे. २०२१ - २२ या आर्थिक वर्षात २ हजार टन मासळी अधिक मिळाली.

त्यामध्ये १,१०,७२४ टन सागरी व ५४०२ टन अंतर्देशीय पाण्यातील आहे. २०२२ - २३ साली हे प्रमाण बरेच वाढले व सुमारे २४ हजार टन मासळी गेल्या आर्थिक वर्षापेक्षा अधिक मिळाली, असे लेखी उत्तर मंत्री हळर्णकर यांनी दिले आहे.

राज्यातून परदेशात गेल्या आर्थिक वर्षात ६३,३३३ मे. टन मासळी निर्यात करण्यात आली आहे. हे प्रमाण गेल्या आर्थिक वर्षापेक्षा जवळजवळ दुप्पटीने आहे. त्या काळात ३६,०५८ टन मासळी निर्यात झाली होती.

२०१८ -१९ या आर्थिक वर्षात ३७,९३८ मे. टन मासळी निर्यात झाल्यानंतर २०१९ - २० तसेच २०२० - २१ या आर्थिक वर्षात मासळीचे निर्यात करण्याचे प्रमाण कोविड काळात घटले होते. ते अनुक्रमे १४.६९९ मे. टन व १३,०१८ मे. टन होते.

किनारपट्टी पोलिस गस्तीवर

मत्स्य बंदीच्या काळात गोव्याच्या अखत्यारीतील समुद्रात येऊन मासेमारी करणाऱ्या महाराष्ट्र, कर्नाटकातील ट्रॉलर्सना रोखण्यासाठी खात्याने कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत असाही प्रश्‍न आमदार व्हिएगस यांनी विचारलेला होता.

त्यावर, ‘तटरक्षक दलाचे जवान या स्थितीवर लक्ष ठेवून त्यांच्यामार्फत वारंवार गस्त सुरू आहे. गोवा क्षेत्रातील समुद्रात किनारपट्टी पोलिस गस्तीवर तैनात करण्यात आले आहेत, असे उत्तर मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'घाली धिंगाणा, मुंबईचा शाणा...' कोकणातील क्रिकेटवेड्या चाहत्यांनी 'हिटमॅन'साठी गायलं खास गाणं, पाहा व्हायरल व्हिडिओ

Dabolim Airport: दाबोळीला 'देशांतर्गत विमानतळ' दर्जा देण्‍याचा प्रस्‍ताव नाही

ISL 2026: एफसी गोवाची अपराजित मालिका खंडित, बंगळूर एफसीचा 2-0 असा सफाईदार विजय

Black Coffee Music Event controversy: 'ब्लॅक कॉफी' कार्यक्रमावरून वाद, काँग्रेसकडून चौकशीची मागणी; प्रशासनावर मोठे आरोप

उन्हाचा चटका आणि महागाईचा फटका! घामाच्या धारांनी नागरिक हैराण; मागणी वाढल्याने भाजीपाला-फळं महागली

SCROLL FOR NEXT