CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session : अनुकंपा तत्वाखालील सरकारी सेवेबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिली 'ही' माहिती, म्हणाले ६१६ जणांचे..

325 जणांना घेतले सेवेत सामावून : आमदार वीरेश बोरकर यांच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांचे लेखी उत्तर

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Monsoon Session : सरकारी सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला अनुकंपा तत्‍वाखाली सरकारी सेवेत नोकरी दिली जाते. त्‍या अनुषंगाने गेल्या साडेपाच वर्षांत आलेल्या अर्जांपैकी अजूनही 616 जण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.

विविध खात्यांत अर्जदारांच्या पात्रतेनुसार रिक्त जागांअभावी लाभार्थ्यांना अजून त्याचा लाभ मिळालेला नाही, असे लेखी उत्तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले. सांत-आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी याबाबत प्रश्‍न विचारला होता.

कार्मिक विभागाने २०१८ ते आतापर्यंत अनुकंपा तत्‍वाखाली ३२५ लाभार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विविध सरकारी खात्यांमध्ये सामावून घेतले आहेत. त्यातील दोघांचे अर्ज फेटाळण्यात आले.

एकाने या योजनेखाली अर्ज केला होता, त्याला सरकारी सेवेत त्यापूर्वीच नोकरी मिळाली आहे. तर, एकाने केलेल्या अर्जात त्याचे वय ६० वर्षे उलटून गेल्याने तो सरकारी सेवेसाठी पात्र ठरत नसल्याने त्‍यास अपात्र ठरवण्यात आले.

अर्ज केलेल्या ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३.५ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, त्यांचा प्राधान्यक्रमाने विचार केला जातो, अशी माहिती मुख्‍यमंत्री म्हणाले.

अनुकंपा तत्‍वाखाली सरकारी खात्यात ‘क’ व ‘ड’ वर्गातील जागा अर्जदारांना देण्यात येतात. रिक्त असलेल्या जागांनुसार त्यांना सेवेत घेण्यात येत आहे. खात्यांमध्ये जसजशा रिक्त जागा होतील, तसतसा या प्रलंबित अर्जदारांचा विचार केला जाईल, अशी माहिती मुख्‍यमंत्र्यांनी लेखी उत्तरात दिली.

यंदा आतापर्यंत ४७ जणांना घेतले सेवेत

  • २०१८ - १२१

  • २०१९ - ८०

  • २०२० - ७७

  • २०२१ - ११०

  • २०२२ - ९८

  • २०२३ - ४७ आतापर्यंत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Voter Adhikar Yatra: 'मतदार अधिकार यात्रे'ने राहुल गांधींना बळ, पण फायदा काँग्रेसऐवजी मित्रपक्षांना

''आशिष नेहराच्या कॉटेजला पंचायतीची परवानगी नाही'' केळशी ग्रामसभेत वादळी चर्चा

Salcette: पॉप्युलर हायस्कूलमध्ये 'चतुर्थीचा बाजार'; विद्यार्थ्यांडून सजावट, माटोळी साहित्याची विक्री

Goa Live News: "गोव्यातील माटोळी विक्रेत्यांकडून सोपो वसूल करू नये" मुख्यमंत्री

Sanquelim Road Issue: देसाईनगर साखळीतील रस्ता बनला धोकादायक; तातडीने डागडुजीची करण्याची रहिवाशांची मागणी

SCROLL FOR NEXT