BJP President Damu Naik  Dainik Gomantak
गोवा

Goa News: क्रीडा आणि संस्कृती मंत्र्याविना होणार पावसाळी अधिवेशन; गोवा मंत्रिमंडळात अधिवेशनानंतर फेरबदल

Goa Cabinet Reshuffle: गोवा विधानसभेचे अधिवेशन २३ जुलै आणि ०८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत होणार आहे.

Pramod Yadav

पणजी: पाच दिवसांवर येऊन ठेपलेले गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन क्रीडा आणि संस्कृती मंत्र्यांविना होणार असं दिसतंय. गोविंद गावडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्यानंतर नव्या मंत्र्यांची निवड होणे अपेक्षित होते. पण, अधिवेशन उरकल्यानंतरच मंत्रिमंडळ फेरबदल होईल असे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिले.

पावसाळी अधिवेशनापूर्वी भाजपने युतीतील नेत्यांसह पणजीतील एका हॉटेलमध्ये महत्वाची बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासह भाजपचे आमदार, मंत्री तसेच अपक्ष आमदारांनी हजेरी लावली होती. या बैठकीनंतर दामू नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला.

गोवा विधानसभेचे अधिवेशन २३ जुलै आणि ०८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत होणार आहे. सत्ताधाऱ्यांना घेरणाऱ्या विरोधकांच्या प्रयत्नांना निष्फळ करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

भाजप नेत्यांनी पक्षातील नेत्यांवर आरोपप्रत्यारोप करु नये, अशी सूचना यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केली. सर्वांनी पक्ष शिस्तीचे पालन करावे असेही नाईक यावेळी म्हणाले. दामू यांनी यावेळी रखडलेला मंत्रिमंडळाचा फेरबदल अधिवेशन उरकल्यानंतर होणार असल्याचे संकेत दिले. ०८ ऑगस्ट रोजी अधिवेशन समाप्त झाल्यानंतर याच महिन्यात मंत्रिमंडळाचा फेरबदल होण्याची शक्यता आहे.

विधानसभेच्या येत्या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याचे विरोधकांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरवण्यासाठी सत्ताधारी गटाने बैठकीत रणनिती आखली. उल्लेखनिय म्हणजे, अलीकडेच मंत्रिमंडळातून वगळले गेलेले आमदार गोविंद गावडे यांनी देखील यावेळी हजेरी लावली होती.

त्यांच्या उपस्थितीने सत्ताधाऱ्यांतील एकसंघतेचा संदेश देण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसून आला. बैठकीत मंत्र्यांबरोबरच सत्ताधारी आमदारांनी उपस्थित राहून विरोधकांच्या संभाव्य प्रश्नांची, आरोपांची व आंदोलनांची चर्चा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa live News: वाऱ्यामुळे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूकीवर परिणाम

Goa Crime: हॉटेल रेटिंग करा, पैसे मिळवा! गोव्यातील महिलेला 3 लाखांचा गंडा; संशयिताला राजस्थानमधून अटक

Goa Electricity: गोव्यात विजेची मागणी वाढणार दुपटीने! औद्योगिक उत्पादनात होणार वाढ; लोह-पोलाद उद्योग आघाडीवर

Fauja Singh: जगातील सर्वात वयस्कर, 114 वर्षांचे मॅरेथॉनपटू फौजा सिंह यांचे अपघाती निधन! जालंधर-पठाणकोट हायवेवर कारने दिली धडक

India Pakistan Tension: 'भारत- पाकिस्तानमधील अणुयुद्ध मी थांबविले'! ट्रम्प यांचा पुन्हा दावा

SCROLL FOR NEXT