Tourism Minister Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session: प्रत्येक घराला मिळणार इंटरनेट कनेक्शन, स्टार्टअपमध्ये 30 टक्के महिला; सभागृहात काय घडलं?

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: अधिवेशनाचा दुसरा आठवडा! वीज, शिक्षण आणि पुरातत्व खात्यासंबधित प्रश्नोत्तराचा तास

Pramod Yadav

मंत्री रोहन खंवटे उत्तरात काय म्हणाले?

१) हर घर फायबर अंतर्गत वीज आणि पाणी कनेक्शन असणाऱ्या प्रत्येक घराला मिळणार इंटरनेट कनेक्शन मंत्री खंवटे यांची माहिती.

२) गोव्यात दोनशेपेक्षा अधिक स्टार्टअपस् आहेत त्यात तीस टक्के महिला आहेत. तुये काही दिवसांत क्लस्टर होईल, त्यात स्थानिकांना नोकरीची संधी मिळेल.

३) गोवा प्रिटींग प्रेस स्थलांतरीत केली जाईल.

४) काही पेड इन्फ्युएन्सर्स गोव्याचे नाव खराब करत आहेत. गोव्याचे पर्यटन विधेयक सुमारे ३३ बैठकांनंतर जाहीर करण्यात आले आहे.

राजकीय नाही सदिच्छा भेट!

गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी‌.नड्डांसोबतची भेट राजकीय नाही. ही सदिच्छा भेट. मंत्री विश्वजीत राणेंचे प्रतिपादन. राणेंच्या या भेटींमुळे पुन्हा राजकीय चर्चांना जोर.

विधानसभा अधिवेशन सुरु असताना विश्वजीत दिल्लीत?

राज्यात विधानसभा अधिवेशन सुरु असताना मंत्री विश्वजीत राणे दिल्लीत. राणेंनी गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतल्याची माहिती. आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मांना भेटल्याचा फोटो राणेंनी आपल्या सोशल मिडीयावर अकाऊंटवरुन शेअर केला.

कोकणीतून छपाई करण्यास आम्ही तयार!

कोकणीतून कागदपत्रे छपाई करण्यास प्रिटींग खाते तयार. आम्ही काही कोकणी अनुवादक घेतलेत. OFFICIAL LANGUAGE खात्याकडून आम्हाला साहित्य मिळाल्यास आम्ही कोकणीतून छपाई करण्यास तयार. मंत्री रोहन खंवटेंची सभागृहात माहिती‌.

Goa Sunburn: ना उत्तर, ना दक्षिण कुठेच नको; गोव्यात सनबर्नवर बंदी घाला

ना उत्तर, ना दक्षिण गोव्यात कुठेच सनबर्न आयोजित केला जाऊ नये त्यावर बंदी घालण्याची मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली. सनबर्न हा ड्रग्स फेस्टिवल. दक्षिण गोव्यातील लोकांच्या भावनांशी सरकारने खेळू नये.

कुडचडेत कार्निव्हल सुरु करा; माजी मंत्री निलेश काब्राल यांची मागणी

कुडचडेत कार्निव्हल सुरु करण्याची मागणी माजी मंत्री आमदार निलेश काब्राल यांनी केली. यापूर्वी तो होत होता पण अलिकडे बंद केल्याचे काब्राल म्हणाले.

गोव्याचे मॉरिशस झाले असते पण...; विजय सरदेसाई

पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, गोव्याचे मॉरिशस झाले असते पण डबल इंजिन सरकारने राज्याचे पट्टाया आणि सौमालिया यांच्यामधील हायब्रीड केले आहे. मंत्री जाणकार आहेत, त्यांनी उत्तम प्रवास केला आहे आणि तो एक हुशार उद्योगपती देखील आहे तो कुठे तोटा आहे, तिथे तो गुंतवणूक करणार नाही, असे सरदेसाई म्हणाले.

पारंपारिक सांजाव शिवोलीत साजरा केला जावा, पर्यटन विभागाने ते साजरे करू नयेत त्याऐवजी त्यांनी पारंपारिक पद्धतीने साजरा करणाऱ्या स्थानिकांकडे द्यावे आणि विभागाने त्यांना पाठिंबा द्यावा, असे विजय म्हणाले.

तर ब्रॅन्ड गोवाला फटका बसणार- विजय सरदेसाई

सर्व विमानकंपन्या आपली विमान सेवा दाबोळी विमानतळावरून मोपा विमानतळावर हलवत आहेत. असे झाल्यास सर्व पंचतारांकित हॉटेल्स चे नुकसान होईल. ह्याचा मोठा फटका ब्रॅंड गोवा ला बसू शकतो असे विजय सरदेसाई म्हणाले.

बोंदेरा महोत्सवासाठी निधी द्या - फळदेसाई

सरकार इतर इव्हेंट साठी करोडो रूपये खर्च करते. पण दिवार बेटावर होणाऱ्या बोंदेरा सारख्या महोत्सवासाठी कमी रक्कम देते. हा महोत्सव घडवून आणायला जवळपास ५० लाख रूपये खर्च येतो आणि याला देश विदेशातील पर्यटक उपस्थिती लावतात.

निदान यावेळी तरी एवढी रक्कम सरकारने द्यावी अशी मागणी राजेश फळदेसाई यांनी सभागृहात केली.

सांगडोत्सवासाठी २० -२५ लाख तरी द्या - राजेश फळदेसाई

सांगडोत्सवासाठी यावर्षी तरी २०-२५ लाख रुपये द्या, अशी मागणी कुंभारजुआचे आमदार राजेश फळदेसाई यांनी केली.

सेंट फ्रान्सिस झेविअर्स अवशेष प्रदर्शनासाठी योग्य नियोजन करा - मायकल लोबो

ओल्ड गोव्यात होऊ घातलेल्या सेंट फ्रान्सिस झेविअर्स अवशेष प्रदर्शनासाठी योग्य नियोजन करा, अशी मागणी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केली आहे.

दोना पावल जेट्टी स्थानिकांसाठी खुली नाही; आमदार जेनेफर मोन्सेरात यांच्या मागण्या

- दोना पावल जेट्टी स्थानिकांसाठी खुली नाही, रात्री आठनंतर स्थानिकांना तिथे जाता येत नाही.

- जेट्टी इव्हेंटसाठी दिल्याची माहिती आहे त्याबाबत खुलासा करावा

- आणि करंझाळे समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करावी अशी मागण्या जेनेफर मोन्सेरात यांनी केल्या.

ओएसडीच्या परदेश दौऱ्याचे एक कोटी चार लाख बिल, चौकशीची फेरेरांची मागणी

मंत्री जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात त्यावर माझा काहीच आक्षेप नाही. पण ओएसडी परदेश दौऱ्यावर जातात त्यांच्यावर बिलापोटी एक कोटी चार लाख एवढा खर्च होतो, त्याची चौकशी व्हायला हवी. पर्यटन मंत्र्यांचे ओएसडी शॉन मेंडीसबाबत कार्लुस यांचा सवाल.

शिक्षण खात्याबाबत मुख्यमंत्र्यांची उत्तरे

१) शाळांना चांगल्या पायाभूत सुविधा मिळाव्यात आणि शासकीय शाळांसाठी आवश्यक वस्तूंसाठी येत्या वर्षभरात प्रयत्न केले जाणार.

२) गणित आणि विज्ञान प्रयोगशाळेसाठी चार कोटी रुपयांची तरदूत. नव्वद दिल्याची मुख्यमंत्री सावंत यांची माहिती.

३) तिसऱ्या भाषेचा पर्याय उपलब्ध (फ्रेंच, पोर्तुगीज आणि जर्मन)

कमी लक्षवेधी सूचना चर्चेला घेत असल्याचा दावा; विरोधकांची सभपातींच्या हौदात निदर्शने

कमी लक्षवेधी सूचना चर्चेला घेत असल्याचा विरोधकांचा दावा. सातही विरोधकांची सभपातींच्या हौदात जात निदर्शने. कामकाज अडीचपर्यंत तहकूब.

मृत तरुणीच्या कुटुंबीयांना चा लाखांची मदत

पणजीत झाड कोसळून मृत झालेल्या आरती गोंड या १९ वर्षीय तरुणीचा झाडाच्या फांद्यांखाली सापडून मृत्यू झाला होता. या तरुणीला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चार लाख रुपये नुकसान भरपाईची घोषणा सभागृहात केली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला आमचा विरोध नाही - आमदार कार्लुस फेरेरा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला आमचा विरोध नाही. आम्हाला फक्त त्याच्या योग्य अंमलबजावणीबाबत आश्वसत करा. गोव्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या भविष्यासाठी हे महत्वाचे आहे. घाई गडबडीत धोरण अंमलबजावणी करु नये अशी आमची भूमिक आहे, असे काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा म्हणाले.

NEP वरुन विरोधकांनी शिक्षणमंत्र्यांना घेरले

राष्ट्रीय शिक्षण धोरणावरुन विरोधकांनी मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना घेरत. औपचारिक मराठी, कोकणी आणि हिंदीसह फ्रेंच, पोर्तुगीज आणि जर्मनी भाषेचीही मागणी.

राज्यात वीज कपात ४० टक्क्यांनी कमी

राज्यातील विविध ठिकाणी होत असलेल्या वीज कपातींसंबधित प्रश्न उपस्थित करण्यात आले. पण राज्यातील वीज कपात ४० टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा वीज खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

DSSY चे 13 हजार बोगस लाभार्थी! समाजकल्याण खात्यातर्फे पडताळणी; 50 कोटी रुपयांची वसूली

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

SCROLL FOR NEXT