Goa Assembly monsoon session 2023 cm Pramod Sawant 
गोवा

विरोधकांनी मणिपूर हिंसाचार तर CM ने शिवाजी महाराजांबद्दल फादरच्या वक्तव्याचा विषय काढला; गोवा विधानसभेत गोंधळ

प्रश्नोत्तर आणि शून्य प्रहर झाल्यानंतर विरोधक चर्चेसाठी आग्रही झाले व वेलमध्ये उतरले.

Pramod Yadav

Goa Assembly monsoon session 2023: गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशानात पहिल्या दिवसापासून मणिपूर हिंसाचारावर चर्चेची मागणी विरोधी पक्षातील आमदार करत आहेत. तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी काळी कपडे घालत सभागृहात प्रवेश केला.

विरोधी पक्षातील आमदारांनी चर्चेची मागणी करत गोंधळ घातल्यानंतर सात आमदारांवर सभापतींनी निलंबनाची कारवाई केली.

दरम्यान, शुक्रवारी विरोधकांनी पुन्हा मणिपूर हिंसाचारावर चर्चेची मागणी केली मात्र, सभापतींनी हा खासगी ठराव रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला.

मणिपूर हिंसाचारावर अधिवेशनात चर्चा व्हावी असा खासगी ठराव आमदार क्रुझ सिल्वा यांनी आणला होता. त्यावर चर्चा व्हावी अशी मागणी विरोधी पक्षातील आमदार करत होते. शुक्रवारी सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मागणी लावून धरली. दरम्यान, प्रश्नोत्तराच्या तासानंतर चर्चेचा विचार केला जाईल असे आश्वासन सभापती तवडकर यांनी दिली.

प्रश्नोत्तर आणि शून्य प्रहर झाल्यानंतर विरोधक चर्चेसाठी आग्रही झाले व वेलमध्ये उतरले. यावेळी सभापतींनी ठरावाविषयी त्यांचा निर्णय जाहीर केला.

'मणिपूर हिंसाचाराचा विषय संवेदनशील आहे. तेथील राज्य सरकार त्यावर कारवाई करत आहेच, शिवाय देशाच्या गृहमंत्रालयाने याची दखल घेतली आहे. त्यामुळे मणिपूर हिंसाचारावरील चर्चेचा ठराव रद्द करत आहे.' असे सभापती रमेश तवडकर यांनी स्पष्ट केले.

लंचनंतर सभागृह पुन्हा सुरू झाले त्यानंतर युरी आलेमाव ठराव रद्द करण्याचा निर्णय लोकशाही विरोधी असल्याचे म्हणत पुन्हा विरोधातील आमदारांनी गोंधळ घातला.

यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मणिपूरचा विषय संवेदनशील असल्याचे सांगत, फादर बोलमॅक्स परेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा विषय काढला. फादरने माफी मागितली पण, समाजिक तिढा निर्माण करणारे विषयांना हात घालायला नको असे मुख्यमंत्री सावंत यांनी सभागृहात स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT